मुंबई, ता. ७ - राज्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची तसेच काही पथकर नाके बंद करण्याची शिफारस आज संबंधित समित्यांनी प्रस्तावित केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पथकराचे धोरण अधिक पारदर्शी होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा आवश्यक असल्याचे सुचविले होते. त्या अनुशंगाने शासनाने तीन स्वतंत्र समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांची बैठक गेल्या महिन्यात श्री. भुजबळ यांनी दोनदा घेतली होती. आज सायंकाळी रामटेक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या समित्यांनी केलेल्या शिफारशींची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली. श्री. भुजबळ म्हणाले, की खाजगीकरणाचे धोरण व पथकर प्रणाली रस्त्यांच्या विकासासाठी जागतिक स्तरावर देशात वापरली जाते. राज्यातही या पद्धतीचा अवलंब करून सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्पही राज्यातच राबविला गेला. या धोरणामुळे रस्ते विकासात खाजगी गुंतवणूक होऊन राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद कमी वाहतुक असलेल्या...