मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

cricket लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवराज सिंग याला कॅन्सर...

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर

झिंबाब्वे चे माजी कसोटीपटू डंकन फ्लेचर यांची भारतीय संघाचा कोच (प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. श्री. फ्लेचर यांनी यापूर्वी इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद सुमारे आठ वर्षे भूषविले आहे. अधिक माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.