पिंपरी (20 नोव्हेंबर 2013) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत दुस-यांदा भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मान आयोजक महेश लांडगे यांना व भोसरीकरांना देण्यात आाला. या स्पर्धा भोसरीतील ज्येष्ठ पै. किसनराव शंकरराव लांडगे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिं.चिं. मनपा कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी 2013 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर नानासाहेब शितोळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी (19.11.2013) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ...