मुख्य सामग्रीवर वगळा

भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी (20 नोव्हेंबर 2013) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत दुस-यांदा भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मान आयोजक महेश लांडगे यांना व भोसरीकरांना देण्यात आाला. या स्पर्धा भोसरीतील ज्येष्ठ पै. किसनराव शंकरराव लांडगे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिं.चिं. मनपा कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी 2013 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर नानासाहेब शितोळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी (19.11.2013) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने होत आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व आयोजक नगरसेवक महेश लांडगे, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पोपटअण्णा फुगे, रुस्तम-ए- हिंद पै. अमोल बुचडे, भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे, राष्ट्रीय खेळाडू शंकर कंधारे, उपमहाराष्ट्र केसरी विशालअप्पा कलाटे, नगरसेवक नितीन लांडगे, शांताराम बापू भालेकर, वस्ताद मारूतीदादा गव्हाणे, पै. मारुती कंद, वस्ताद रामचंद्र लांडगे, पै. तुळशीराम लोंढे, पै. चंद्रकांत लांडगे, पै. रंगा फुगे आदी मान्यवर उपस्थित होते. रविवार दि. 1 डिसेंबर 2013 रोजी भोसरी येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर मा. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे, पिं.चिं.कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, माजी महापौर व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, माजी महापौर व पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, दत्ता साने, नितीन काळजे, चंद्रकांत वाळके, समीर मासुळकर, राहुल जाधव, धनंजय आल्हाट, महिंद्रा कंपनीचे एच.ओ.डी. विजय नायर, जालिंदर शिंदे, ॲड. नितीन लांडगे, संजय वाबळे, नगरसेविका सुरेखाताई गव्हाणे, सुनीताताई गवळी, शुभांगी लोंढे, डॉ. श्रद्धा लांडे, माजी नगरसेवक पंडीतशेठ गवळी, साहेबराव खरात, संतोष (अण्णा) लोंढे, अण्णासाहेब मगर बँकेचे नंदकुमार लांडे, माजी नगरसेविका सिमाताई फुगे, जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष संदीप (आप्पा) भोंडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम बुधवार दि. 4 डिसेंबर 2013 रोजी सायं. 7 वा. कृषीमंत्री मा. ना. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे सभापती दिलीप वळेस पाटील साहेब, गृहमंत्री मा.ना.आर.आर. पाटील साहेब माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर मा. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पिं.चि. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा भोसरी स.नं. 1 येथे 15 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या 60 हजार प्रेक्षक क्षमता असणा-या भव्य स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रथमच 15 फुट बाय 20 फुट आकाराचे 4 अत्याधुनिक एल.सी.डी. स्क्रीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धा पाहणे सुखकर होणार आहे. 25 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था स्टॅण्ड गॅलरी मध्ये व 35 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था मॅटवर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी 40 बाय 40 आकाराचे दोन मॅटचे आखाडे व एक 40 बाय 40 मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. आखाड्यात वापरण्यासाठी लाल माती खास कोल्हापूर वरून आणली असून गेल्या 10 दिवसांपासून तिची मशागत करण्यात येत आहे. या मातीत दही, लिंबू, तेल, हळद, कापूर टाकून तिची मशागत करण्यात येत आहे. या ठिकाणी 100 फुट बाय 60 फुट असे तीन टप्प्यातील भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. आखाड्याचे सुत्रसंचालक ज्येष्ठ कुस्ती तज्ज्ञ पुजारी तर व्यासपीठाचे सुत्र संचालन ज्येष्ठ सुत्र संचालक राणाप्रताप तिवारी हे करणार आहेत. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून 44 जिल्हा संघाचे गट सहभागी होणार आहेत. एकूण 7 वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये 55 किलो, 60 किलो, 74 किलो, 84 किलो, 96 किलो वजनी गटाचा समावेश आहे. या प्रत्येक वजनी गटातील विजेत्या मल्लांना गोल्डन, सिल्व्हर, ब्रॉन्झ पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 84 ते 120 किलो या वजनी गटात होणार असून विजेत्या मल्लाला चांदीची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व मल्लांना ट्रॅक सूट देण्यात येणार आहे. शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी पैलवानांचे आगमन होणार असून त्याच वेळी स्पर्धकांचे वजन घेण्यात येईल. रविवारी दि. 1 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता सहभागी पैलवानांचे संचलन भोसरीत होणार आहे. यामध्ये भोसरीतील सर्व तालीम मंडळे, वस्ताद, भोसरी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, सर्व सार्वजनिक मंडळे सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास, भोजन, वाहनव्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. वाहन पार्किंगसाठी स्टेडियमच्या तिनही बाजूस 15 एकर जागेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस अधिकार-यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसरात 100 हून जास्त सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी स्टेडियम मध्ये येताना पाण्याची बाटली, कॅरीबॅग आणू नये असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी 100 खासगी बाऊन्सर, 100 सुरक्षा रक्षक, 500 स्वयंसेवक, पोलीसांना सुरक्षा व्यवस्थेसाठी मदत करणार आहेत. कुस्ती आराखड्याच्या कडेला 10 फुटांवर एक व 5 फुटांवर एक असे दोन रेलिंग लावण्यात येणार आहे. आखाड्यात फक्त मल्ल, पंच आणि प्रशिक्षक यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पत्रकारांसाठी, वैद्कीय पथकांसाठी खेळाडूंच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी दोन पथके, रुग्णवाहीका अग्निशामक दलाचे दोन बंब असणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै.किसनराव लांडगे, पै. रामचंद्र लांडगे, पै. मारुती दादा गव्हाणे, पै. पोपटराव फुगे, पै. किसन शिंदे, पै. पितांबर शिंदे, पै.तुळशीराम लोंढे, पै.कचदेव लोंढे, पै. गुलाब फुगे, पै. चंद्रकांत लांडगे, पै. हिरामण लांडगे, पै.महादु लांडगे, पै.बाबा लांडगे, पै. लाला लांडगे, पै. मदन गव्हाणे, पै. गणपत गव्हाणे, पै. बाळासाहेब गव्हाणे, पै. भरत फुगे, पै. बाजीराव लांडगे आदी परीश्रम घेत आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा मागील 25 वर्षामध्ये वेगाने औद्योगीक विकास झाला त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात भोसरीच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. शहराच्या या सर्वांगीण विकासात भोसरीकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसचे शहराच्या क्रीडा विकासात भोसरीचे नाव आदराने घेतले जाते. कुस्ती तसेच कबड्डीचे शेकडो खेळाडू भोसरीच्या तालमीत व मैदानात आतापर्यंत तयार होऊन त्यांनी भोसरीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे. यामध्ये कुस्तीपटू कै. पै. नामदेव लांडगे, कै. पै. सोपानराव गुळवे, कै. पै.सदाशिव फुगे, कै. पै. विश्वनाथ पांडुरंग लांडगे यांचे नाव आदराने घ्यावे लागते. तसेच पै. चंद्रकांत लांडगे, पै. तुळशीराम लोंढे, पै. नारायण लांडगे, पै. विष्णुपंत लांडे, पै.कचदेव लोंढे, पै. वस्ताद रामचंद्र लांडगे, पै. मारुतीदादा गव्हाणे, पै. किसनराव लांडगे, पै. रंगनाथ फुगे, पै. किसन शिंदे, पै. पिलाजी शिंदे, पै. लक्ष्मण शिंदे, पै. हिरामण लांडगे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या स्पर्धेचे आयोजन भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नगरसेवक महेश लांडगे यांच्या प्रेरणेतून या फाऊंडेशनची स्थापना 2002 मध्ये झाली. त्यानंतर फाऊंडेशनने खेळाडूंसाठी विविध उल्लेखनीय उपक्रम राबविले व स्पर्धांचे आयोजन केले आहे. यात प्रामुख्याने 2009 साली ‘‘महाराष्ट्र श्री 2009’’ ही स्पर्धा भोसरीत घेण्यात आली. या स्पर्धेत 700 हून जास्त खेळाडूंचा सहभाग होता. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे खो-खो मध्ये वरीष्ठ महिला गट व कुमारी गट असे दोन संघ राज्यभर दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत. या संघामध्ये पूजा शेलार व लविना गायकवाड या राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वरिष्ठ महिला गटात 50 हून जास्त महिला खेळाडू रोज सरावाला उपस्थित असतात.महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या क्रीडा उपक्रमांतर्गत कराटे क्लब, मेडीटेशन हॉल, बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. याचा शेकडो खेळाडूंना लाभ होत आहे. 2007 सालापासून महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने चार ठिकाणी योग शिबिर सुरु आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...