मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लॉकडाउन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णय

सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे तपशील (Installments) व ते भर...