मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

sachin tendulkar brand ambessador लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सचिन...सिडनी येथे महाशतक झळकण्याची अपेक्षा!

क्रिकेट जगताचा बादशहा...अगदी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा खुर्चीला खिळवून ठेवणारा सचिन क्रिकेट खेळण्यासाठी कोणत्याही देशात गेला, तरीही मैदानावर जाताना मॅचचे प्रत्यक्ष वर्णन करणाऱ्यापासून अम्पायरसुद्धा खुश होणारच. शतकाचे महाशतक झळकवण्यासाठी योग्य संधीच्या शोधातल्या सचीनने गेल्या काही दिवसात संयम मात्र अजिबात सोडला नाही. सिडनी येथे सचिनचे हे शतक नक्की झळकणार असल्याची अपेक्षा अनेक चहाते व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आजपर्यंतचे खेळाडू पाहिले तर या सगळ्यांची उंची जेमतेमच असल्याचे सहज जाणवते. सर ब्रॅडमन, रिकी पॉइंटिंग, सुनिल गावस्कर ही नावं यासाठी लगेच डोळ्यासमोर येतात. यांची उंची कमी असली तरीही शारीरिक आणि बौद्धिक उंची फारच उंच आहे. तिथपर्यंत पोहोचायला अजून अनेकांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तेंडुलकरने "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्यासाठी भुजबळ यांची विनंती

मुंबई, ता. २४- सन २०११ हे वर्ष महाराष्ट्र शासन पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचा "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. तेंडुलकर यांच्या सहमतीसाठी कृषिमंत्री व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केली आहे. भारतीय पर्यटन विकास महामंडळाने अभिनेता आमीर खान, झारखंडने महेंद्रसिंग धोनी, गुजरातने अभिनेता अमिताभ बच्चन यांची "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" म्हणून नियुक्ती केली आहे. याच धर्तीवर तेंडुलकर यांची नियुक्ती करावी अशी भुजबळ यांची इच्छा असून त्यांनी तसे पत्र तेंडुलकर यांना पाठविले आहे. भुजबळ यांच्याकडे याव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार असल्यामुळे, ज्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या योग्य सुविधा नाहीत त्या उपलब्ध करता येऊ शकतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना पंचतारांकित सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०११ हे पर्यटन