मुख्य सामग्रीवर वगळा

तेंडुलकरने "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्यासाठी भुजबळ यांची विनंती

मुंबई, ता. २४- सन २०११ हे वर्ष महाराष्ट्र शासन पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचा "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. तेंडुलकर यांच्या सहमतीसाठी कृषिमंत्री व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केली आहे.
भारतीय पर्यटन विकास महामंडळाने अभिनेता आमीर खान, झारखंडने महेंद्रसिंग धोनी, गुजरातने अभिनेता अमिताभ बच्चन यांची "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" म्हणून नियुक्ती केली आहे. याच धर्तीवर तेंडुलकर यांची नियुक्ती करावी अशी भुजबळ यांची इच्छा असून त्यांनी तसे पत्र तेंडुलकर यांना पाठविले आहे. भुजबळ यांच्याकडे याव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार असल्यामुळे, ज्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या योग्य सुविधा नाहीत त्या उपलब्ध करता येऊ शकतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना पंचतारांकित सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०११ हे पर्यटन वर्ष म्हणून साजरे करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटनाच्या संधी पर्यटकांना समजाव्यात, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी राज्याकडे आकृष्ट व्हावे आणि राज्याच्या महसूलात पर्यटनाद्वारे अधिकाधिक वृद्धी व्हावी, यादृष्टीने योग्य प्रचार-प्रसिद्धीची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012