मध्यंतरी झालेल्या अकाली पावसामुळे राज्यासह देशाच्या अनेक भागात मुख्यत्वे कांदा हे हाती आलेले पीक खराब होऊन कांद्याने न चिरताच डोळ्यात पाणी आणले होते. सुमारे चाळीस रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेल्यानंतर शासनाने त्वरीत हालचाली केल्यामुळे काही राज्यात जाणवणारी कांद्याची कमतरता आणि परिस्थितीनुरुप वाढलेले भाव कमी होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमधून कांदा संबंधित राज्यात पुरवला जाणार असल्याचा निर्णय कृषि मंत्रालयाने घेतला आहे.
खाण्यासाठी आणि स्वयंपाकात चवीपुरता का होईना, कांदा मिळणार असल्याचा आनंद आणि गुदगुल्या ग्राहक आणि गृहिणींना होत आहे.
खाण्यासाठी आणि स्वयंपाकात चवीपुरता का होईना, कांदा मिळणार असल्याचा आनंद आणि गुदगुल्या ग्राहक आणि गृहिणींना होत आहे.