मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बकरी ईद व कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान ईदनिमित्त ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी सकाळी नमाज अदा करून देशाच्या विकास आणि एकजुटीसाठी प्रार्थना केली. पंढरपूर येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनातर्फे ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्यात येत होत्या.
मध्यंतरी अकाली पाऊस पडल्याने पीकाचे नुकसान होऊन अनेक शेतकर्यांच्या तोंडचा घासच जणू ओढला गेला. यामुळे आता तरी पाऊस पडू नये अशी आळवणी काही भाविकांनी यावेळी केली. मंदीर परिसरात गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी होती.