आदर्श गृहनिर्माण सोसोयटीची कागदपत्रे गहाळ झाल्याबद्दल विभागाचे नगरविकास विभागाचे सचिव गुरुदास बाजपे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श गृहनिर्माण सोसोयटीतील सदनिका प्रकरणी राजीनामा देण्याच्या हाय कमांडने केलेल्या सूचनेमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागली. स्वच्छ प्रतिमा असलेले पृथ्वीराज चव्हाण अशी त्यांची ख्याती आहे. आगामी निवडणुका ध्यानात घेऊन काँग्रेसने चांगली खेळी खेळल्याचे आता विरोधकांचा आरोप खरा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रकरणाची कागदपत्र गहाळ होतातच कशी? आता आदर्श गृहनिर्माण सोसायटीच गहाळ न होवो म्हणजे मिळवले..। तसे येत्या डिसेंबरमध्ये आदर्श सोसायटीची जागाच जमीनदोस्त करण्यात येण्याच्या वृत्ताला सूत्रांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. यातच सर्व काही आले असल्याचा सूर आहे.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.