मुख्य सामग्रीवर वगळा

फुले दाम्पत्याचे विचार आजही मार्गदर्शक- के. शंकरनारायणन्

मुंबई, ता. २१- देशातील सामाजिक तसेच आर्थितक विषमता दूर करण्यासाठी सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. असे प्रतिपादन राज्यापाल के. शंकरनारायणन् यांनी केले.
वांद्रे (पश्चिम) येथील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या संकुलात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले, की देशाला महासत्ता बनविण्यासाठी, परिवर्तनाची मोठी आवश्यकता आहे. दैनंदिन जीनवात आपण सातत्याने छोटेमोठे बदल स्वीकारतो. मात्र, तेव्हाच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल देखील वेळोवेळी स्वीकारले पाहिजे. यासाठी आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची गरज असून हे केवळ फुले दाम्पत्याच्या विचारांमधूनच शक्य आहे. आजच्या महिला आणि विद्यार्थीनी यांनी फुले दाम्पत्याचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज आपण सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने वावरत आहात. महात्मा फुले पायाभूत सुविधांचे एक कृतीशील विकासक होते.
गुलामगिरी, शेतकर्‍याचा असूड आदी पुस्तकांबरोबरच मंडळी आणि सत्यशोधक समाज संस्था आदी माध्यमातूनही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा, विचारांचा प्रसार केला. त्यांनी मांडलेले त्री-भाषा सूत्र आज संपूर्ण भारतात वापरले जात आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. देशात  विकास घडवून आणण्यासाठी युवा पिढीने फुले दाम्पत्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवून सामाजिक  परिवर्तनाचे दूर बनले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले. आमदार पंकज भुजबळ यांनी आभार मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012