मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पावनखिंड विकासासाठी सव्वादोन कोटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पावनखिंड पर्यटन विकासासाठी पहिल्या टप्प्यात सव्वादोन कोटी

मुंबई, ता. १८ - कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड (ता. शाहूवाडी) या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यासाठी पावनखिंड परीसरात पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. शाहूवाडी-पन्हाळा परीसरातील विविध विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, ऐतिहासिक पावनखिंड परीसराचा विकास करण्याच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्या, सुशोभीकरणासह स्मृतीस्तंभ उभारणी, प्रवेशद्वार ते वाहनतळ रस्ता, वाहनतळ उभारणी, निरीक्षण मनोरा, स्वच्छतागृह व विश्रांतीस्थळ, ओढ्यावर लहान पूल आदी कामे करण्यात येतील. यासाठी २ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल. शिराळा व पन्हाळा तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता असलेल्या सावर्डे (जि. कोल्हापूर) ते कांदे (जि. सांगली) या मार्गावर वारणा नदीवर उंच पातळीचा मोठा पूल बांधण्याचे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे काम नाबार्ड अंतर्गत करावयाच्या कामात प्रस्तावित करण्यात येईल. तसेच पिशवी ते खोतवाडी...