मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विठ्ठल उमप श्रद्धांजली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विठ्ठल उमप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई. ता. 26-  जांभूळ-आख्यान या विस्मरणीय लोकनाट्यामुळे जनमानसांवर अधिराज्य गाजविलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा लोकरंगनायक काळाच्या पडद्याआड गेला. मनोरंजन आणि प्रबोधन यांची सुरेख सांगड घालणारे स्व. उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत रंगभूमीची सेवा केली, या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला. लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला-उपमुख्यमंत्री पवार लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री विठ्ठल उमप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली. श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की उमप यांनी लोककलेचा प्रत्येक कलाप्रकार आत्मीयतेने हाताळला. जांभुळ-आख्यान सारखा कार्यक्रम सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. वयाच्या 80 वर्षानंतर देखील ते तळमळीने लोककला सादर करीत होते. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते आणि लोककलेची साधना करीत होते. उपेक्षितांच्या दुःखांना वाचा फोडणारा कलावंत हरपला - छगन भुजबळ लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनाने फुले-शाहू-आंब