ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी झाली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. प्रभाकर पणशीकर यांनी "तो मी नव्हेच" मधील लखोबा लोखंडेच्या भूमिकेसह अनेक नाटकांमध्ये साकारलेल्या विविध भूमिका अविस्मरणीय ठरल्या.