मुंबई, ता. ११ - ज्येष्ठ पत्रकार बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे आपण एका जुन्या स्नेह्याला आणि वृत्तपत्रसृष्टी ज्येष्ठ जागरूक पत्रकाराला कायमची अंतरली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. बाळ देशपांडे हे पत्रकारितेच्या क्षेत्रातले दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या देशपांडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समतोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारांच्या हक्काबद्दल ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या निधनामुळे तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.