सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

खासदारांचे वेतन वाढले..पण महागाईचे काय...?

अनेक दिवसांपासून चर्चेत आणि रेंगाळत असलेला खासदारांचा वेतनवाढ प्रश्न संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे सुटला...परंतु सामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, देशात सतत आलेख उंचावत असलेल्या महागाई कमी करण्याबाबत कागदोपत्री घोषणा, आंदोलनाखेरीज काहीच होत नाही.
खासदारांचे वेतन सोळा हजार असून हे वाढविण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. या संदर्भात नेमण्यात आलेल्या संसदीय समितीने संसद सदस्यांचे वेतन वाढवून ते 80 हजार रुपये करण्याची शिफारस केली होती. मात्र मंत्रिमंडळाने आज (ता. २०) 60 हजार रुपये वेतन देण्यास मंजुरी दिली. यासह कार्यालयीन खर्चासाठी तसेच मतदारसंघ खर्चासाठी दिल्या जाणार्‍या 20-20 हजार रुपये भत्त्यात दुप्पट वाढ झाली आहेच. उपलब्ध माहितीनुसार, मंत्रिमंडळाने 16 हजारांऐवजी 50 हजार रुपये वेतन देण्यास तर दोन्ही भत्त्यांमध्ये दुपटीने वाढ करून ते 40-40 हजार रुपये करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय वाहन खरेदीसाठी व्याजमुक्त कर्जाची सीमा वाढवून ती एक लाख रुपयांवरून 4 लाख रुपये करण्यास, वाहनासाठीचा इंधनभत्ता प्रतिकिलोमीटर 13 रुपयांवरून 16 रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आजपर्यंतच्या अनुभवानुसार वेतन वाढ किंवा मिळणार्‍या सेवा, सोयींमध्ये वाढ करण्याबाबत, नियमित मिळण्याबाबत बहुदा सर्वच खासदारांचे एकमत असते. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतील गैरव्यवहारांच्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर ही वेतनवाढ अनुचित असल्याचे काही मंत्र्यांचे मत आहे. काही राजकीय पक्षांच्या खासदारांनी तर ही वेतनवाढ चक्क अपुरी असल्याचे म्हटले आहे. हा सर्व पैसा सामान्य जनतेच्या खिशातूनच जाणार!
खासदारांना मतदार संघासाठी प्रति किलोमीटर इंधन खर्च देखील दिला जातो, मात्र आपण मतदार संघात वैयक्तिक किती फिरतो, किती कार्य करतो, अंमलबजावणी करतो, निवडणूकपूर्व दिलेल्या आश्वासनांची आजतागायत किती प्रमाणात पूर्तता झाली? पूर्तता करण्यात यशस्वी झालो? या गोष्टींचे खासदारांनी स्वतः लोकप्रतिनिधी या नात्याने चिंतन करण्याची गरज आहे.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये वीजेचा प्रश्न गंभीर होत असून, शासन पुरेशी वीज नागरीकांना देण्यास सध्यातरी सक्षम नसल्याचे चित्र वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या वृत्तांमधून स्पष्ट होत आहे. तरी देखील वीज दरवाढ करून मागितली जाते आहे. वीज दरवाढ हा काही विरोधकांचाच प्रश्न वा मुद्दा नाही, खासदार सुद्धा एक नागरीक आहेतच, त्यामुळे वेतनवाढीच्या मुद्द्याप्रमाणेच वीज दरवाढ, महागाई कमी करण्यासाठी सर्वच खासदारांनी राष्ट्रीय स्तरावर एकत्र येऊन वेठीस धरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महागाईचा आलेख सातत्याने उंचावतो आहेच, विविध वस्तूंवर कर आकारणी होत आहे, अनेक गोष्टींना कर आकारणीसाठी जाळ्यात ओढले जात आहे.
झाली तितकी वेतनवाढ पुरे झाली असे समजून आता खासदारांनी देशात महागाई, वीज दर, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी एकत्र येऊन प्रखर विरोध करण्याची गरज आहे.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

ब्लॉगवरील फोटो

या ब्लॉगवर पोस्ट होत असलेले फोटो आपणांस आवडतात का? आणखी विविध विषयांचे फोटो हवे का?

सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

'फ्रेंडशिप'चं 'शिप' स्थिरावतय मैत्रीच्या समुद्रात....!

Water is dramatic and hard to ingore, it is hard to be in different to it, also! पाणी हा घटक संवदेनशील आणि दुर्लक्ष न करण्यासारखा आहे आणि पाण्यापासून स्वत:ला दूर ठेवणे कठीणच ! दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातलं वाक्य आठवलं, ''ज्यला आय नाय त्याल काय नाय.'' मैत्रीचं अर्धातच 'फ्रेंडशिप'च सुद्धा तसच आहे. ज्याला मित्र नाही त्याला काहीच नाही. दिवसोंदिवस वाढणारी टेन्शन्स घालवण्यासाठी फ्रेंडशिप सारखा दुसरा कोणताच चांगला आधार नाही. दशकापूर्वीपासून भारतातसुद्धा आलेलं मित्रांच्या मैत्रीचे हे जहाज अर्थात 'फ्रेंड्‍स'चं शिप आता मैत्रीच्या अथांग समुद्रात स्थिरवलं आहे.
आई असो की बाबा, ताई असो की दादा... प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतातच. पूर्वीच्या काळात असलेलं आई-‍वडिल आणि मुलं यांच्यातलं अंतरही आता कमी झालय. दोघेही मुलांशी मित्राप्रमाणे वागू लागले आहेत, वागण्याचा प्रयत्न करताहेत. याला काही अपवाद असतील. याचा परिणाम चांगलाच (पॉझिटीव्ह) दिसत असून दोन पिढ्यांमधला दुरावा कमी होत असल्याचं जाणवतं आहे.
A friendship is someone who knows the song is your heart and can not sing it back to you when you have forgotten the words.....! हे आपल्या आई-वडिलांना....लागू पडते. आपल्या हातून काही चुक झाल्यास पाठीवरून प्रेमाच्या मोरपीसाने हात फिरवणारी आई, आणि 'पुन्हा असं करू नकोस' असं म्हणणारे बाबा आपल्याला संभाळून घेतात.
मुलंसुद्धा लवकर मॅच्युअर (परिपक्व) होत आहेत. योग्य अयोग्य यातला फरकही त्यांना समजू लागलाय. मात्र, काहीही असलं तरी कोणामागचं 'टेन्शन' हे अजून सुटलेलं नाही. गरिबांना गरीबीचं, श्रीमंतांना श्रीमंतीचं, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरीत कामाचं.... ज्याला त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. अभ्यास, नोकरी यात दिवसातले दहा तास घराबाहेर जातात. यामुळे ही टेन्शन्स कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मित्रासारखा दुसरा कोणताही घटक नसतो. आई वडिल रागावले, बॉसशी भांडण झालं तरी या विषयी चर्चा करायला सगळ्यात जवळचा वागणारा ‍'मित्र' हाच असतो, हा अनुभव आहे.
आजकलच्या मुलांना इंटरनेटमुळे ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, जी टॉक यांनी जवळ आणलयं, मुलं दूर असली तरी यामुळे एकमेकांमध्ये अंतर कमी झालयं. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने कित्येक मैत्रीची नाती फ्रेंडशिक बेल्ट्‍समध्ये घट्ट बांधली जातील. मात्र मैत्रीबद्दल अल्बर्ट कॅमस यांनी म्हटलंय -
Don't walk in the front of me, I may not follow,
Don't walk behind me, I may not lead
Walk beside me and be my friend.....!
फक्त एकच आपण मैत्री करत असलेला हा मित्र किंवा मैत्रिण आपली फसवणुक तर करत नाही नां, हे नक्की समजून घ्या, त्यासाठी आपले पालक, चांगले शिक्षक यांची मदत-सहकार्य जरून घ्या.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...