सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी १७ जून २०२६ रोजी स्वीकारली. सिडकोचे मुख्य कार्यालय असलेले सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे श्री. अश्विन मुद्गल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या श्री. अश्विन मुद्गल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळयेथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचेअतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. श्री. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत. “सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्...