मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ant लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'ज्वारी-बाजरी' मध्ये लाल मुंग्यांमुळे व्यापारी त्रस्त

इंदूर ता. २७- ऊन मी म्हणत असून पार्‍याने ४१ अंश सेल्सिअस पार केले आहेत. मध्यप्रदेशमध्ये 'नवतपा' म्हणून सध्या(जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) च्या नऊ दिवसांकडे पाहिले जाते. या नऊ दिवसांमध्ये जितके ऊन कडक असेल तितका पाऊस छान पडतो असे म्हणतात. उन्हाळ्यात विशेषतः लाल मुंग्यांचा त्रास सर्वत्र असतो. मात्र येथील बाजारपेठेत सध्या धान्य व्यापारी त्रस्त आहेत ते म्हणजे यांच्याकडील ज्वारी, बाजरीमध्ये लाल मुंग्या झाल्या आहेत. बाजूलाच साखरेची पोती असून त्यात मात्र मुंग्या झाल्या नाहीत, हे विशेष...