इंदूर ता. २७- ऊन मी म्हणत असून पार्याने ४१ अंश सेल्सिअस पार केले आहेत. मध्यप्रदेशमध्ये 'नवतपा' म्हणून सध्या(जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) च्या नऊ दिवसांकडे पाहिले जाते. या नऊ दिवसांमध्ये जितके ऊन कडक असेल तितका पाऊस छान पडतो असे म्हणतात. उन्हाळ्यात विशेषतः लाल मुंग्यांचा त्रास सर्वत्र असतो. मात्र येथील बाजारपेठेत सध्या धान्य व्यापारी त्रस्त आहेत ते म्हणजे यांच्याकडील ज्वारी, बाजरीमध्ये लाल मुंग्या झाल्या आहेत. बाजूलाच साखरेची पोती असून त्यात मात्र मुंग्या झाल्या नाहीत, हे विशेष...
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.