मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन २०१२ – २०१४ जिल्हाध्यक्ष

विशेष प्रतिनिधी (दि. ३० मे):  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत निवडणूक २०१२-२०१४ जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हानिहाय एकत्रित आलेल्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रवक्ता मोहन बाफना यांनी एकत्रित बैठक घेऊन नावांसंदर्भात चर्चा करून जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित केली. 
यानुसार जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी अशी(तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची नावे २ जून नंतर जाहीर करण्यात येतील)-रत्नागिरी- सर्वश्री शेखर निकम, रायगड- वसंत ओसवाल, ठाणे शहर जितेंद्र आव्हाड, ठाणे ग्रामीण- आनंद ठाकूर, भिवंडी- शेख खलिद गुड्डू, 
उल्हासनगर- ज्योती कालानी, नवी मुंबई- गोपीनाथ ठाकूर, मिरा भाईंदर- मोहन पाटील, पुणे ग्रामीण- सुरेश घुले, पिंपरी चिंचवड- योगेश बहल, सातारा- शशिकांत शिंदे, सांगली शहर- इद्रिस नायकवाडी, सांगली ग्रामीण- विलासभाऊ शिंदे, सोलापूर शहर- महेश गादेकर, सोलापूर ग्रामीण- के. पी. पाटील, नाशिक शहर- रविंद्र कोशिरे, नाशिक ग्रामीण- अॅड. रविंद्र पगार, धुळे शहर- चंद्रकांत केले, धुळे ग्रामीण- राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार- श्रीमती कमलाताई मराठे, 
जळगाव शहर- विनोद देशमुख, जळगाव ग्रामीण- अब्दुल गफ्फार मलिक- आ. दिलीप सोनवणे (कार्याध्यक्ष), अहमदनगर शहर- संग्राम जगताप, अविनाश घुले (कार्याध्यक्ष), अहमदनगर ग्रामीण- घनश्याम शेलार, औरंगाबाद शहर- मुस्ताक अहमद, औरंगाबाद ग्रामीण- सुधाकर सोनवणे, परभणी- विजय भांबळे, हिंगोली- मुनिर पटेल, बीड- अशोक डक, नांदेड ग्रामीण- बापूसाहेब गोरठेकर, उस्मानाबाद- सुरेश बिराजदार, लातूर शहर- मुर्तुझा खान, नवनाथ आल्टे (कार्याध्यक्ष), बुलढाणा- सोपान साठे, वाशिम- सुभाष राठोड, अमरावती शहर- अॅड. किशोर शेळके, अमरावती ग्रामीण- विजय भैसे, यवतमाळ- सुरेश लोणकर, नागपूर शहर- अजय पाटील, भंडारा- अविनाश ब्राह्मणकर, गोंदिया- विनोद हरीणखेडे, चंद्रपूर- राजेंद्र वैद्य.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.