मुंबईत लष्कर ए तैय्यबा चे चार अतिरेकी शिरले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिल आहे. २६-११ ची घटना अजून शमत नाही तोच पुन्हा एकदा नापाक अतिरेक्यांचे लक्ष्य शांत आणि सर्वधर्मसमभावासाठी पवित्र मानल्या जाणार्या मुंबईकडे आहे.
शहरातील गर्दीची ठिकाणे, स्थानके, विविध धार्मिक स्थळे आणि अतीसंवेदनशील भागांना अतिरेकी लक्ष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही तासातच नाताळ सण सुरू होत असून लवकरच नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव याच्या उधाणाचा उत्साह पसरेल. या पार्श्वभूमीवर पोलिसांना व विशेष पथकास पाचारण करण्यात आले असून नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. २६-११ घटनेतील हाती लागलेला आरोपी कसाब हा पाकिस्तानचा नागरीक असल्याचे सबळ पुरावे देखील उपलब्ध झाल्याचे न्यायालयात सिद्ध करण्यात आले आहे. विविध क्लुप्त्यांनी कसाब स्वतःची सुटका न्यायालयातून करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप संसदेवर हल्ला करणार्यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आलेली असली तरीही अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतिंकडे प्रकरण गेले असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कसाबचे काय व्हायचे ते होईल परंतु मुंबईमध्ये सध्या शिरलेले हे चार अतिरेकी पोलिसांना सापडल्यास त्यांना पोलिसांनी कंठस्नान घालावे अथवा नागरिकांच्या सुपूर्द करावे असे अनेक नागरिकांचे मत आहे. बहुदा देशाच्या सुरक्षिततेसारख्या गंभीर प्रकरणांच्या घटनेतील आरोपींना अद्याप फाशी न दिली जाणे हे यामागील प्रमुख कारण असावे. मुंबईत प्रवेश केलेल्या या अतिरेक्यांची नावे अब्दुल करीम मुसा, नूर अबू इलाही, वालिद जिन्नाह आणि महफूज आलम आहेत. त्यापैकी वालिद जिन्नाहचे छायाचित्र पोलिसांना मिळाले असून ते प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात देखील मुंबईमध्ये दोन अतिरेकी शिरल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र हे अतिरेकी शोधण्यात पोलिस अथवा सुरक्षा यंत्रणेस अद्याप यश आलेले नाही. दोन वर्षापूर्वी इतकी गंभीर घटना घडून देखील सुरक्षा व्यवस्थेत कुठेतरी ढिलाई असल्याचे हे द्योतक अथवा यंत्रणेचे अपयश असल्याचे मानले जात आहे. आता तरी खडबडून जागे होऊन अतिरेकी शोधावे व भविष्यकाळात एकही अतिरेकी भारतात येणार नाही इतकी कडक सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात यावी, हीच अपेक्षा.
सावधगिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सावधगिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...