मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दैनिक विश्वरूप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 11 एप्रिल :  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील 'दै. विश्वरुप'ने काढलेल्या 'महात्मा' या विशेषांकाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सकाळी प्रकाशन करण्यात आले. श्री. भुजबळ यांच्या 'रामटेक' निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तरुण पिढीला महात्मा फुले यांच्या कार्याची महती व माहिती ज्ञात करुन देण्याच्या दृष्टीने 'दै. विश्वरुप'ने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या विशेषांकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संपादक सतीश धारप यांनी सांगितले की, 'दै. विश्वरुप'च्या या विशेषांकात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री सुनिल तटकरे, प्रा. हरि नरके, नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांचे लेख आहेत.