शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

What is "Visa"?

A visa is a form of permission for a non-citizen to travel to, enter, transit or remain in a particular country. A visa does not guarantee entry. That remains the right of the immigration officials of the country concerned.
Some countries may ask visitors to present return tickets and evidence of means to cover their intended stay. Some countries may refuse entry to visitors who do not comply with their requirements regarding general appearance and clothing.

Some countries have compulsory currency exchange regulations on first entry. Only the country/countries you plan to visit can provide up-to-date information about visa requirements for South African passport holders.
Types of Visa:
Tourist Visa
      A Tourist Visa is given to those visiting India for tourism or other non-business related purposes and is generally valid up to 6 months.

Business Visa
      A Business Visa is given those who are doing business in India such as making sales or establishing contacts on behalf of a company outside of India. This type of Visa may be valid for one year or more with multiple entries. However, the period of stay in India (for each visit) under this category is limited to six months only.
Journalist Visa
      A Journalist Visa is given to professional journalists and photographers for up to three months' stay in India. For applicants who to make a documentary in India, kindly contact the Press and Information wing in the Embassy/Consulate.
Conference Visa
      This type of Visa is for international conferences, or on certain subjects, as decided by the Government of India from time to time. Such a Visa can be issued only after clearance for the said conference is received from the Government of India.
Transit Visa
      A transit visa is granted for the sole purpose of enabling the holder to travel through India to reach his/her ultimate destination. Change of purpose is not allowed. The Transit visa is valid for direct transit only for a maximum period of 3 days. For a stay in India beyond 3 days, an appropriate visa should be obtained.
Entry Visa
      An Entry Visa is issued to those of India origin visiting India for tourism or other non-business related purposes. Members of the family of a person employed in India are also eligible for Entry visa. In the latter case, documents establishing the employment of the spouse along with a copy of his/her Employment visa must be attached.
Employment Visa
      An Employment Visa is granted to those who are an employee of an Indian company. The Embassy/Consulate may grant Employment visa valid for a year irrespective of the duration of the contract. Further extension up to 5 years could be obtained from MHA/FRRO in the concerned state in India.
Student Visa
      Student visas are given to bona fide students to pursue regular studies at recognised institutions in India. The Visa has multiple entry options and is valid for the period of study as approved by the educational institution in India.
Missionaries Visa
      Missionary Visas are granted for those going to India for religious purposes and a single entry visa is issued.
Research Visa
      Research Visas are given to Research Professors or Scholars and to participants attending research Conferences/Seminars/Workshops. Applicants should apply for this Visa at least six weeks before their date of departure to India.
Sports Visa
      This visa is for professional and amateur sportspeople, judges and adjudicators who want to come to India to participate in their field of sport. In fact, it's an invitation letter from India to the persons involved in sports
. (Information: Through sources and may be vary. Please ensure before using reference)

भारतीय हत्ती तुर्कमेनिस्तानात- सरकारकडूनच कायद्याची पळवाट!

भारतीय हत्तींची एक जोडी तुर्कमेनिस्तानमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. तुर्कमेनिस्तान सरकारच्या विनंतीवरून ही जोडी पाठविण्यात येणार आहे. भारत सरकारकडून दोन हत्ती भेट मिळावे अशी अपेक्षा तु्रकमेनिस्तान सरकारने केली होती. परंतु वन्यजीवांना भेट देण्यावर भारतात बंदी असल्यामुळे ते शक्य नव्हते. आता, दोन्ही देशांमधील प्राणिसंग्रहालयां दरम्यान देवाण-घेवाण करण्याच्या प्रस्तावाखाली दोन भारतीय हत्ती तिकडे पाठविण्यात येतील. याचाच अर्थ सरकारने स्वत:चा कायद्याची पळवाट शोधून काढली आहे. कायदे करणार्‍यांनीच शक्कल लढवून कायद्याची पळवाट शोधून काढली आहे, इतरांनी अशा पळवाटा शोधण्यात वाईट काय..? म्हणतात नां, कायदे तितक्या पळवाटा...!

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०१०

सांग दर्पणा कशी मी दिसते..

                                                      ।..सांग दर्पणा कशी मी दिसते..।
                                                    ।।..माझ्यामुळे रूप तुझे रे खुलते..।।

विजयी उमेदवारांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे: भुजबळ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्‍यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्‍यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या.
यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

"बर्ड्स अँड बिग कॅट्स" प्रदर्शन उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, किरण शांताराम, अ‍ॅड. अधिक शिरोडकर आदी
जहांगिर आर्ट गॅलरी मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नामवंत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. अधिक शिरोडकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे.
अ‍ॅड. शिरोडकर यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांमध्ये रमले आहेत. त्यांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या प्रदर्शनात आहेत. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शिरोडकर यांनी पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले असून, हे प्रदर्शन मनाला आनंद आणि निसर्गाच्या वैविध्याचा परिचय करून देणारे आहे. डिजिटल युगात छायाचित्रणाची कला बरीच सुलभ झाली आहे. परंतु जुन्या कॅमेर्‍यांनी छायाचित्रण करताना खूप कसरत आणि मेहनत करावी लागते. मनासारख्या छायाचित्रासाठी विशिष्ट क्षणाची वाट पहावी लागत असून, संयमाच्या या परीक्षेत शिरोडकर यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यास विचारात घेऊन त्यांना पर्यावरण विषयक विविध समित्यांवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
वन्यजीवनाविषयी असलेली ओढ आपल्याला शांत बसू देत नाही. दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्‍हास होत आहे, जंगल कमी होत असून ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. याविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केल्याचे श्री. शिरोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमास किरण शांताराम, विठ्ठल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"

ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्‍या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे.
दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आणला कोणी? अर्थातच चहा हे सुद्धा इंग्रजांचेच पेय होते. इंग्रज भारतातून परत जाताना सॉरी हा शब्द आणि चहा हे पेय सोडून गेले असावे..।
पूर्वी गावाच्या चौकात, मोकळ्या मैदानात होणार्‍या कुस्तीच्या स्पर्धा आता जवळपास नाहीशा झाल्या आहेत, काही शहरांमध्ये अजूनही होतात हा अपवाद. ठिकठिकाणी उभारलेल्या व्यायामशाळा, एखाद्या आठवडे बाजाराच्या मैदान, शाळेचे प्रांगण अशा ठिकाणी मुद्दाम तशी जमीन तयार करून तेथे कुस्ती खेळली जाते. कुस्ती या शब्दाची जागा देखील रेसलिंग या शब्दाने घेतली आहे. शुभरात्री या शब्दाऐवजी गुड-नाईट सहजपणे नकळत म्हटले जाते. सुप्रभात ऐवजी गुडमॉर्निंग, दिनचर्या ऐवजी रुटीन, हो ऐवजी ओके, सस्पेंड, कॅज्युअल, टाइम-लिमिट, चेंज, बॅकग्राउंड असे कितीतरी शब्द दररोजच्या बोलण्यात वापरले जातात. इंग्लिश + मराठी = मिंग्लीश असे नवीन समीकरण आता तयार झाले आहे. बर्‍याच प्रमाणात हे बदल आवश्यक सुद्धा आहेत, असेही अनेकदा प्रत्यय येतात. याचबरोबर, फक्त बॅकग्राउंड म्हणजेच पार्श्वभूमी हा शब्द उच्चारायचा असल्यास मागचे बॅकग्राउंड असा शब्दप्रयोग केला जातो, बॅकग्राउंड हे मागचेच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पू्र्वी वापरले जाणारे "शाळा-बिळा, जिलबी-बिलबी, आलतू-फालतू, चहा-वहा, बटाटे-बिटाटे, बाजार-बिजार, भाजी-बीजी, नाश्ता-बिश्ता" असे शब्दांमागून येणारे अनेक शब्द मात्र अजून तसेच वापरले जातात. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी यशस्वीपणे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम् commonwealth games) च्या माध्यमातून "व्हाइटवॉश" हा मधुन-मधून ऐकला जाणारा शब्द आता सर्रासपणे नियमित वापरण्यास प्रसार माध्यमांसह, बोलीभाषेतही सुरवात झाली आहे. खरंतर, टक्कर, पराजय, हार, धुव्वा उडवणे या मूळ शब्दांच्या ऐवजी "व्हाइटवॉश" हा शब्दप्रयोग करण्यात आलेला दिसतो, अशा विविध इंग्रजी शब्दांमुळे मराठी शब्द पार धुतले गेले आहेत! हे मात्र खरं आहे, की मिंग्लीश जरी असले, तरीही हे नवीन मराठी टाकाऊ अजिबातच नाही, कालानुरुप होत असलेले हे बदल कोणीही नाकारू नये हे मात्र नक्की...!

Om..ओम्...!!!

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

इंडो-चायना फटाके: यंदाचा आनंद ठरणार उद्याची डोकेदुखी...!

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा बहुसंख्य ठिकाणी 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके बाजारपेठेत उपलब्ध करण्यावर निर्मात्यांचा भर आणि विक्रेत्यांचा कल आहे. फटाक्यांच्या उत्पादनासाठी फटाके उत्पादकांनी चिनी फटाके उत्पादकांच्या सहकार्याने यंदा इंडो-चायना फटाके दिसतील. कमी आवाजाचे आणि या फटाक्यांमधून विविध रंग ओसंडून असल्यामुळे ग्राहकांना आणि शासनाला दोघांनाही आनंद होईलच. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे लवकरच हा आनंद मावळून ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताचा किती मोठा भूभाग बळकावला आहे याची कल्पना देखील न करता येईल असे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेख, बातम्यांवरून वाटते. सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने अक्षरशः कॅप्चर केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चायना मार्केट च्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय.
इंडो-चायना फटाके तयार करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली, कुणास ठाऊक! परंतु याची फलप्राप्ती चांगली होणार नाही. ग्राहक एकदा हॅबिच्युअल झाल्यानंतर त्याला अपेक्षित ब्रँड मिळाल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. या फटाक्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाल्यास चीन लवकरच त्यांचे स्वतःचे फटाके देखील भारतीय बाजारपेठेत विक्रीस आणू शकते अशी भीती तज्ज्ञ जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही भीती खरी ठरल्यास देशातील फटाके निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाकाशीसारख्या अनेक ठिकाणच्या फटाके तयार करण्याच्या कारखान्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागेल आणि शासन नेहमीप्रमाणे कोणतीही कृती करणार नाही असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Ye hai India...

निसर्गाने स्वतःच भारताचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न...आपल्या देशावर मानवासह निसर्ग सुद्धा प्रेम करतो, हेच तर या माध्यमातून सांगायचे नसेल नां?

जादू चालणार..फक्त मतदारांची!

बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच..परिणामी, राहुल गांधी यांना अजून भरपूर काही शिकण्याची गरज आहे, त्यांनी शायनिंग बंद करावे असे मत आता ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी मंडळी व्यक्त करीत आहेत...! काहीही असले तरीही खरा जादूगार "मतदार"च आहेत यात शंका नाही. यावर कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी यादवांवर टीका केली. बिहारमध्ये राहुल यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून झालेल्या निराशेतूनच त्यांचे राजकीय संतुलन बिघडले आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी (ता. २५) भारतीय संघाची (टीम इंडिया) घोषणा करण्यात आली. मात्र घोषित झालेल्या संघात युवराजसिंग याचा समावेश करण्यात आलेला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगबरोबर प्रग्यान ओझा, अमित मिश्रा यांना समावेश करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना ४ नोव्हेंबरपासून अहमदाबाद येथे सुरु होईल. दुसरा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे, तर तिसरा सामना २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल.
अशी आहे टीम इंडिया: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हिव्हिएस लक्ष्मण, राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा, एस श्रीसंत, चेतेश्वर पुजारा, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा.

झाले इंदूरकर रसिक मंत्रमुग्ध: गीतरामायण

येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले.
श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्यापर्यंत पाहोचू शकले व शब्दातील अभिप्रेत भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकला.
श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या "राम जन्मला, कुश-लव रामायण गाती, पराधीन आहे जगती, माता न तू वैरिणी, जय गंगे जय भागीरथी, जेथे राघव.." इ. अनेक गीतांनी रसिक मने न्हाऊन निघाली.
आपण आपले वडिल म्हणजेच स्व. बाबूजी यांना घाबरत होतो, गीतरामायणातील पद सर्वप्रथम आपण आपल्या आईला सर्वप्रथम ऐकवले, हे पद ऐकवताना मला अचानक बाबूजी तिथे आल्याचे जाणवले आणि साक्षात बाबूजी तिथे उभे असल्याचे पाहून पार घाबरगुंडी उडाली, मात्र त्यांनी कौतुकाने पाठीवर हात फिरवून गाणे सुरू ठेवण्याची सुचना केल्याने खूप आनंद झाला, असे सांगितले. गीतरामायणाची रचना १९५५ मध्ये करण्यात आली, गीतरामायणातील विविध शब्दांवर बाबूजींनी दिलेला जोर त्याचे महत्व आदी गोष्टी विशद केल्या. गीतरामायण कितीही कथन केले तरीही वेळ अपूर्णच वाटतो, सर्वकाही आपल्या समोरच सुरू असल्याची हे गाताना आपल्याला अनुभूती येते या शब्दात मनोगत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी श्रीधर फडके यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ‘संगीत मनमोही रे’ ही नुकतीच प्रकाशित झालेली त्यांची सीडी यावेळी श्रीधर फडके यांच्या स्वाक्षरीसह वितरीत करण्यात आली.
श्रीधर फडके यांनी इंदूरकर अजूनही मराठी टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करून मराठी बोलणारा आजकाल मुंबईत दुर्मिळ होत चाललाय असे मत व्यक्त केले. पार्षद विनिता धर्म यांनी सूत्रसंचालन केले.

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

कथा ई-एज्युकेटेड चोराची...।

दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समिती मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात कॉम्प्यूटरची रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) चोरल्यामुळे एका संशयित सफाई कर्मचार्‍याला ताब्यात घेण्यात आले. बिच्चारा! @ हा सफाई कर्मचारी देखील ई-एज्युकेटेड किंवा माहिती तंत्रज्ञान विषयात प्रवीण असावा, किंवा बेरोजगारीची कुर्‍हाड याच्यावरही कोसळली असावी. अनेकांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, आपण हजारांचा भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले? असे याला वाटले असावे आणि कार्यभाग साधला असावा. परंतु मांजर डोळे मिटुन दूध पिताना कोणी ना कोणी त्याला पाहतेच नां...। अगदी तेच केलंय क्लोज-सर्किट कॅमेर्‍यांच्या डोळ्यांनी...।

शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा

शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्‍या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.

money makes all

इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...

इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत.
एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्‍या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याच्या कार्याची भरारी महिलांनी मारली आहे. एकंदर सर्वच बाबतीत महिला अग्रेसर आहेत. मुलांनी मुलांशी आणि मुलींनी मुलींशी फक्त मैत्री करावी, हे विचार आता मागे पडले असून सध्याइंटरनेटच्या काळात मुलं अथवा मुली यांच्यात अंतर फारसे राहिलेले नाही.
मुलं आणि मुलींची मैत्री नाही असे आता अजिबात दिसत नाही. अगदी स्वच्छंदी, निखळ मैत्री या दोघांमध्ये असल्याचे अनेकदा दिसते (काही ठिकाणी विकृतीमुळे अपवादात्मक एकतर्फी काही गोष्टी घडतात, हे वेगळे).
काळ बदलल्याप्रमाणे जुन्या पिढीने सुद्धा हे बदल स्वीकारले असल्याचा हा परिणाम असावा...। जुनी पिढी म्हटली म्हणजे कडक स्वभाव, तिखट, मुलांना नेहमीच डोस देणारी, रागावणारी...वडिलांना तर 'हिटलर' या भावनेनेच पाहण्याकडे मुलांचा जास्त कल असतो, होता। घरात आई-वडिल, ताई-दादा, आजोबा-आजी कोणीही रागावले की मित्राकडे जाऊन किंवा मित्राला हे सर्व सांगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच डोळ्यात साचलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिल्यानंतर मोठ्ठ दडपण कमी झाल्यासारखं पूर्वी वाटत होतं. पण आजकाल इतकं मोठं कुटुंब सुद्धा दिसत नाही, असलं तरी आता हे सर्व दृश्य बदललं असून आज वडिल सुद्धा मुलांशी मित्राच्या नात्याने वागताना दिसतात. आपले बाबा कामावरून घरी परत केव्हा येतात याची वाट आजकाल मुलं पाहतात.
दिवसेंदिवस महागाई सातत्यानेच वाढत असून मुलंही लवकर समजुतदार होत असून, आपल्या पालकांना आपणही काहीतरी हातभार लावावा आणि घर चालवण्यात खारीचा वाटा उचलावा, या उद्देशाने अनेक मुलं-मुली earn and learn अर्थातच शिक्षणाबरोबरच काहीतरी छोटे-मोठे काम करून पैसे मिळवतात. इंटरनेटमुळे तर या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ताटातुट झालेली बहिणभावंडं इंटरनेटच्या माध्यमातून वेबकॅम, चॅटिंगच्या द्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. हो, एक मात्र आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, जी-टॉक मेसेंजर याद्वारे गुगल (सर्च इंजिन), याहू, सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी खातं (ईमेल-आयडी) उघडावं लागतं हे सांगायला नकोच...। खातं या शब्दाऐवजी अकाउंट हा शब्दप्रयोग सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर वाटतो...। असं अकाउंट उघडताना ज्यांना आपल्याशी बोलण्यासाठी आमंत्रित करायचं असेल त्यांचं अकाउंट देखील आपल्या अकाउंटशी जोडणं सक्तीचं आहे. यासाठी फ्रेंड्स-अकाउंट, फ्रेंड्स ची नावं Friends Name, Friends Address, Friend List असे छानसे शब्द वापरले जातात..बहिण असो अथवा भाऊ असो..यांनाही फ्रेंड च्या यादीमध्येच जोडावं लागतं.
"फ्रेंड" या शब्दामुळे दूर गेलेली मित्रमंडळी, बहिण-भाऊ, भावंडं खरंच अगदी क्षणात जवळ येतात, कामावरचं टेन्शन असो, की घरचं टेन्शन असो, दोघेही एकमेकांना सांगून मनं मोकळी करतात. मनात काही न साचल्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा फ्रेश मुडमध्ये कामास सुरवात करू शकतात. फ्रेंड..friend..या शब्दाची फोड आपण free-end..म्हणजेच अगदी न कळत कोणत्याही तणावाचा शेवट...असा इथे समजणे वावगे ठरणार नाही।

काश्मिर प्रश्नाचा एकदाच सोक्षमोक्ष लावावा

वर्षानुवर्ष धुमसत असलेल्या काश्मिर प्रश्नाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी देशातल्या नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या अयोध्या राम-मंदिर बाबरी मशिद यासारख्या संवेदनशील विषयावर न्यायालयाने तोडगा काढून निर्णय दिल्यानंतर ही मागणी जोर धरत आहे.

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

butterfly...

क्रिडामंत्री गिल यांच्यावर पंतप्रधानांची नाराजी

क्रिडामंत्री श्री. गिल यांच्यावर पंतप्रधान मनमोहनसिंग यांची नाराजी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर श्री. गिल यांनी पंतप्रधानांकडे स्कॉटलंड येथे जाण्याची परवानगी मागितली होती. पुढील राष्ट्रकुल स्पर्धा स्कॉटलंड येथे होणार असून तेथील तयारीबाबत स्कॉटलंड येथे आपणांस आमंत्रित करण्यात आले असून यासाठी परवानगी द्यावी, असे गिल यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. परंतु पंतप्रधानांनी गिल यांना जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावरुनच पंतप्रधान गिल यांच्यावर नाराज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

thanks

dear readers
thank you so much for respond.

"राष्ट्र-कुल" नंतर होतेय हॉट अर्थातच "गरम"...

(Kahi Aisa to nahi....) मा. प्रधानमंत्री महोदय : आप मुझसे बात मत करो..।
श्री. कलमाडीजी : सर, मैने क्या किया, के आप मुझसे नाराज है...?




"अमेरिका, इंग्लंड, भारत या तीन देशांचे प्रतिनिधी ब्रह्मदेवाकडे जातात आणि विचारतात..देवा, आमच्या देशातला भ्रष्टाचार कधी संपेल?...देव ध्यानस्थ होतो आणि डोळे उघडून अमेरिकेच्या प्रतिनिधीस सांगतो: थोड्याच वर्षात तुमच्या देशातला भ्रष्टाचार संपेल, काळजी करू नका...। इंग्लंडच्या प्रतिनिधीला सांगतो: जरा जास्त कालावधी लागेल...। भारताची वेळ येते तेव्हा ध्यानस्थ झाल्यानंतर बराच वेळ डोळे उघडतच नाही, उघडल्यानंतर देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात..ते पाहून सगळेच अवाक होतात, थोड्या वेळाने भारताचे प्रतिनिधी विचारतात तेव्हा देव सांगतो: काय करू बाबा...। तुमच्या देशातला भ्रष्टाचार जेव्हा संपेल..तेव्हा ते पाहण्यासाठी मी या विश्वात नसेन....।"
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कोणीतरी सांगितलेला हा विनोद आज आठवला...निमित्त आहे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे...। राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारी दरम्यान देण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. यासह निकृष्ट दर्जाचे बांधकाम, काम झाल्याचा देखील आरोप केला जात आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या अगदी काही दिवस अगोदर एक मोठा पूल कोसळल्यामुळे सूत्रांनी खडबडून सर्वांना जागे केले, या पुलाचे काम सेनेला देण्यात येऊन ही जबाबदारी सुद्धा पेलून अवघ्या काही तासात देशाच्या सैन्याने मजबूत पूल तयार करून दाखवला...। यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना प्रत्यक्ष सुरवात झाली, यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून दिलेला कारवाईचा इशारा आणि कामांच्या पूर्ततेबाबत केलेली तातडीची कार्यवाही यामुळे कामांना मूर्त स्वरूप आले. राष्ट्रकुल चे सर्वोसर्वा सुरेश कलमाडी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसनेच केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल असा इशारा पंतप्रधानांनी दिल्यानुसार स्पर्धा समारोपाच्या दुसर्‍याच दिवशी हालचालींना सुरवात झाली असून तीन-चार दिवसातच चांगला वेग आला आहे. राष्ट्रकुल' निविदांची कागदपत्रे ताब्यात बांधकामातील घोटाळ्याबाबत या महिनाअखेरपर्यंत अहवाल देण्याचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने विविध विभागांना दिले आहेत. दिल्ली महापालिका, दिल्ली विकास प्राधिकरण, केंद्रीय सार्वजनिक विकास खाते या सर्वांना या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या सर्व निविदा प्रक्रियेबाबतची कागदपत्रे गोळा करण्यास प्राप्तिकर विभागाने सुरवात केली आहे. अर्थातच त्यात विविध व्यावसायिकांना देण्यात आलेल्या रकमा तसेच रक्कम देताना वजा केलेला कर, याची माहिती देखील घेण्यात येणार आहे. यासाठी खास पथक नेमण्यात आले असून याचबरोबर एखाद्या प्रकल्पाचा खर्च दाखविताना अतिरिक्त खर्च दाखवून कर टाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचाही संशय आहे, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने स्टेडियमच्या उभारणीपासून त्याला शासन मान्यता अर्थातच ऍक्रिडेशन कार्ड देण्यापर्यंतच्या सर्व निविदांची कागदपत्रं एकत्रित करण्याचे काम सुरू आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी सुरेश कलमाडींवर केलेल्या आरोपांवर श्री. कलमाडी यांनी अप्रत्यक्षपणे, आधी स्वतःच्या राज्यात काय चालले आहे, ते पाहा असेच सांगून एकप्रकारे त्यांना खडसावलेच आहे. स्पर्धा होतात की नाही, स्पर्धा सुरू झाल्यास यशस्वी होतात की नाही? असे अनेक प्रश्नांचा काहुर अनेकांच्या मनात असतानाच राष्ट्रकुल स्पर्धांना सुरवात झाली आणि बारा दिवस स्पर्धा झाल्या, या स्पर्धा यशस्वी झाल्या हे संपूर्ण जगाने इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहिले हे सांगायलाच नको. इतके प्रचंड आयोजन नियोजनबद्ध करणे काही थोडी-थोडकी आणि साधी गोष्ट नाही. हे फेडरेशनतर्फे माइक फेनेल यांनीही स्पष्ट केले.
बहुदा एखाद्या युद्धाचा खर्च व्हावा इतका प्रचंड खर्च (सत्तर हजार करोड रुपये) या स्पर्धा आयोजनात झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली स्टेडियम आता पुढे बहुदा स्वतःची सावलीच पहात राहणार असे सध्याचे तरी चित्र आहे. भ्रष्टाचार संदर्भात करण्यात येणार्‍या चौकशीमध्ये दोषी आढळतील ते आढळतील. श्री. कलमाडी यांनीही आपण चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. चौकशीअंती ते निर्दोष असल्याचे (खरोखरच) सिद्ध झाल्यास कलमाडी यांची मान उंचावेल यात कोणतेही दुमत नाही. मात्र आपल्याच घरातील सदस्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या लोकांमुळे यानंतर कलमाडी यांनी ताठ मानेने आणि मनाने जगायचे असल्यास पक्षात राहू नये असे मानणारे देखील नागरीक आहेत.
परंतु विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल ही शंका मात्र नाकारता येऊ शकत नाही, कारण म्हणतात नां...क्या करें, आदत से मजबूर है..। असे आहे; आग लागल्याशिवाय धूर निघत नाही...। आज संपूर्ण देशात कित्येक ठिकाणी, विभाग, खाती, क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलाय. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा, भ्रष्टाचाराला मान्यताच देऊन टाका..। या शब्दात सरकारवर ताशेरे ओढले आहेत. भ्रष्टाचाराची कित्येक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, अनेक बाबी न्यायप्रविष्ट आहेत. या सर्वांसाठी एखादे जलद न्यायालय ते सुद्धा भ्रष्टाचार न करता सुरू करून तेथे देखील भ्रष्टाचार न करणार्‍या न्यायाधीशाची नियुक्ती करून चौकशीत पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे.

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

दोन बायका: फजिती ऐका!

एक असतो हेडली..त्याला असतात तीन बायका..
पण तीन पैकी दोघींनी केलेली त्याची फजिती ऐका..
एकदा केला त्याने प्लॅन..
म्हणाला, कोणाला सांगाल तर उघडेन तलवारीचे म्यान..
पण बायका त्या बायकाच..
पोटात काही राहिले नाही..
दिली सूचना सरकारला..
सरकारने हेडलीला धरले..
बिचारा हेडली..
प्लॅन उघडकीला आला म्हणून..
दोघींना फटकारले, म्हणतो कसा,
यासाठीच का मी तुम्हाला हेरले..
बिचारा हेडली..
आता काय करावे हे नव्हते कळत..
आता काय करावे हे नव्हते कळत..
बसलाय आता तुरुंगात, बसलाय आता तुरुंगात..
जात्यावर पीठ दळत...।
==========वात्रटिका========उपहास=======जमलं का...!!!

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

सोने झाले सोन्यासारखे..

अशी खचितच एखादी व्यक्ती असेल, की जिला सोनं आवडत नाही, आकर्षण नाही...। अगदी श्रीमंतांपासून गरीबापर्यंत समाजातील सगळ्याच घटकांना सोन्याची क्रेझ असते. त्यातल्या त्यात महिलांचं तर विचारुच नका। सोनं न आवडणारी महिला शोधूनही सापडणार नाही.
सोन्याचा उपयोग विशेषतः मध्यमवर्गीयांना व्यवहार करण्यासाठी चांगलाच होतो. कोणत्याही अडचणीत पैसा जवळ नसला, कमी पडत असला, ऐनवेळी इमर्जन्सी उद्भवल्यास सोनंच शेवटी पैसा मिळवून देणं हा एकमेव पर्याय असतो. इतकं अमूल्य महत्व सोन्याचं आहे. परंतु दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत असून मध्यमवर्गीयांसाठी तरी ते सोन्यासारखेच जणू झाले आहेत. परिणामी आगामी लगीन सराईमध्ये आपल्या मुलीच्या अंगावर सोनं घालण्याबाबत पालक चिंतेत आहेत. सध्या (ही बातमी टाइप होईपर्यंत) सोन्याने वीस हजाराचा टप्पा ओलांडला आहे. थेंबे थेंबे तळे साचे..या उक्तीप्रमाणे एक-एक ग्रॅम सोनं जमवायचा विचार केला तरीही तो सहजासहजी शक्य नाही. कारण सतत वाढणार्‍या महागाईमुळेच उद्याची चिंता असलेली सामान्य व्यक्ती एकदम दोन हजार रुपये देऊ शकत नाही. आज अनेक देणी द्यायची असल्यामुळे पैशाला जणू पाय फुटले असल्याचे चित्र आहे. दिवाळी देखील तोंडावर येऊन ठेपली आहे.

भुजबळ यांची वेबसाइट...

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेबसाइट तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या चिंतन ग्रुपने ही वेबसाइट तयार केली असून www.chhaganbhujbal.org असा वेबसाइटचा पत्ता आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकर आणि भाषा संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या हस्ते वेबसाइटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. भुजबळ यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने चिंतन ग्रुपने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, की अनेकांनी आपल्याला जीवनकार्य लिहिण्याची विनंती केली. परंतु अद्याप आपल्याला बरेच कार्य करायचे आहे.
ही वेबसाइट नियमित अपडेट केली जाणार असून इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचा पर्याय उपलब्ध असलेल्या या वेबसाइटमध्ये भुजबळ यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भुजबळ यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या बातम्या, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील कात्रणांचा येथे समावेश असेल.

उपमुख्यमंत्री भुजबळ यांचा वाढदिवस उत्साहत

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा ६२ वा वाढदिवस (ता. १५) त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यासह राजस्थान, बिहार आदी राज्यातून भुजबळ यांना शुभेच्छा संदेश देण्यात आले. याचबरोबर विविध ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह, अनेक कार्यकर्ते, हितचिंतक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!



उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भुजबळ यांच्यासमवेत खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हे सुद्धा होते. या दोघांनीही राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री भुजबळ यांचाही आज वाढदिवस असून त्यांनाही राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.

दसर्‍यानिमित्त बाजारपेठ तेजीत

मध्यंतरी पितृपक्ष, श्राद्धपक्षामुळे मरगळलेल्या स्थितीत असलेल्या बाजारपेठेत दसर्‍यापूर्वीच आज अष्टमीपासूनच तेजी आली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी देखील दिवाळी व आगामी लगीनसराई पाहता, सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.

DEVISAL...

विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ ला ग्लासगो येथे

एकोणीसव्या राष्ट्रकुल स्पर्धांची सांगता काल दिल्ली येथे झाल्यानंतर राष्ट्रकुलाचा ध्वज ग्लासगो प्रशासनाच्या सुपुर्द करण्यात आला. तत्पूर्वी न भूतो न भविष्यति इतक्या चांगल्या प्रकारे सांगता समारंभ पार पडला.सध्याच्या नियोजित योजनेनुसार सन 2014 मध्ये 3 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा अर्थातच commonwealth games चालतील. यात वेटलिफ्टिंग, जिम्नॅशियम, ऍथेलेटिक्स, रेसलिंग, मॅरेथॉन, रग्बी, टेनिस अशा प्रमुख १७ क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

राष्ट्रकुल स्पर्धेत अखेर शंभरी पार..स्वप्न साकार

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज समारोप होत असून, सुरवातीस मनोदय व्यक्त केल्याप्रमाणे भारत द्वितीय स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला. दुसर्‍या स्थानासाठी इंग्लंडने सुद्धा भारताची बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर भारतीय खेळाडुंनी आपले स्वप्न खरे ठरवत, मनोदयाला जागून दुसरे स्थान टिकवून ठेवले. भारताला एकूण १०१ पदकं मिळाली असून यात ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ ब्राँझ अशी पदकं प्राप्त झाली.

हेही नसे थोडके...अखेर शंभरी गाठली।

राष्ट्रकुल (CWG) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुपारपर्यंत अखेर पदकांची शंभरी गाठलीच..। भारत सध्या (१४ ऑक्टोबर दुपारी ३.००) तिसर्‍या स्थानावर असला, तरीही दुसर्‍या स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी एक संधी अजून हातात आहे. आतापावेतो भारताला ३७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदकं मिळाली आहेत..पाहू या आणखी काय होते ते..।

Reflection: Touch Me..If U Can...!!!

Reflection: TOUCH ME IF U CAN...!!!

चिलीमधील कामगारांना वाचवण्याच्या यशामागे तंत्रज्ञानाचे यश...

चिलीच्या उत्तरेस असलेल्या ऍटाकामा प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात नौदलास यश आले. यासाठी एक विशिष्ट आकाराची कॅप्सुल (५४ सेंटीमीटर रुंद) तयार करून ती कॅप्सुल खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आली होती. या कॅप्सुलमध्ये एकावेळी एक व्यक्तीच समाविष्ट केली जात होती. यामुळे खाणीतल्या अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात जास्त वेळ लागला. परंतु कोणाचीही अखेर न होता..अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. प्राप्त सूत्रांनुसार नासा या संस्थेच्या मदतीने ही मोहिम राबविण्यात आली. या यशात खरंतर या तंत्रज्ञानाचे देखील यश महत्वाचे आहे. लाख मोलाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रुपये किंमतीची यंत्रणाच अखेर उपयोगी पडली...।

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०१०

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने गाठावी शंभरी...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय स्पर्धकांची कामगिरी विलक्षण आहे. नव्वदी पार झाली आहे..शंभरी तरी किमान पूर्ण करावी. आगामी अशियाई स्पर्धांमध्ये सुद्धा याप्रमाणेच किंबहुना यापेक्षा चांगले यश अपेक्षित आहे.

come on India..!!!

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारत दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर घसरला. उद्या (ता. १४) स्पर्धेचा समारोप आहे. अजूनही काही स्पर्धा हातात आहेत. आणखी थोडी मेहनत घेऊन खेळाडुंनी पुन्हा दुसरे स्थान प्राप्त करावे, सगळ्यांनी बळ एकवटून कसब, कौशल्य दाखवा..come on..come on India...Common India...!!!

संधी दिल्याशिवाय अनुभव येईल कसा..?

काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका भारतीय वंशाच्या डॉक्टरांवर त्यांना शस्त्रक्रियेचा पुरेसा अनुभव नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेत रुग्णाचे निधन झाल्यामुळे हा ठपका ठेवण्यात आला. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, परंतु अनेक क्षेत्र अशी आहेत, की जिथे अनुभवाशिवाय पुढचे पाऊल टाकू नये..टाकता येत नाही, टाकल्यास संबंधितांना धोका, हानी होऊ शकते. उदाहरणादाखल, रस्त्यावर वाहन चालवताना रस्त्याची माहिती नसल्यास एखाद्या खड्ड्यात वाहन जातेच नां..? अगदी तसेच आहे. मात्र यासाठी, असे सर्वच अनुभव घेण्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे महत्वाचे आहे. यासाठी ज्येष्ठांनी, वरिष्ठांनी नवीन लोकांना, पदवी घेऊन नुकत्याच बाहेर पडलेल्या तज्ज्ञांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्याला माहिती असलेले सर्व खाच-खळगे त्यांनी सांगणे आवश्यक आहे. नाहीतर कोणत्याही क्षेत्रातील पदवी प्राप्त करून अनुभव नसल्यास व्यर्थच जाणार आहे, वय वाढून काही उपयोग नाही...। हे सुद्धा खरं आहे, की केवळ अनुभवच घेत रहायचे का? ही बाब मात्र स्वतः व्यक्तीने ठरवावी. अनुभवाबरोबर त्या क्षेत्रात आणखी संशोधन करण्यासाठी त्यात प्रयोग करावेच लागतात. पण भलत्या-सलत्या रुग्णावर, ठिकाणी प्रयोग करू नये...। जुन्या लोकांनी नवीन लोकांना संधी द्यावी, हे मात्र नक्की।

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

बलसागर भारत होवो...CWG भारतीय मल्लांना सॅल्युट।

दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मल्लांनी कुस्तीमध्ये सलग दहा (10) सुवर्ण पदके प्राप्त करून देशाच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाच्या नावलौकिकात उज्जवल यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. देश सर्वच बाबतीत पुढे आहे. खेळाडूंना अनेक दिवसांपासून दिलेले प्रशिक्षण आणि मिळालेल्या सुविधा, मार्गदर्शन आणि त्यांचा हुरुप..यामुळेच हे शक्य झाले आहे. पुरुष खेळाडूंची बरोबरी महिला खेळाडूंनी सुध्दा केली आहेच. नेमबाजीद्वारे आपले लक्ष्य सहज टिपुन सुवर्ण पदकांचे मानकरी देखील आपण ठरलो आहोत.
देशाने आपल्या पिलांना मोठे करण्यासाठी जगात कुठेही स्वच्छंदपणे उडून यश मिळवण्यासाठी त्यांच्या पंखांना असेच बळ कायम देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सुद्धा व्यसनापासून दूर रहावे, देशाने सुद्धा भ्रष्टाचारापासून दूर व्हावे..। असे झाल्यास भारत खरंच महाशक्ती होऊन बलशाली होईल, यात शंकाच नाही.


===========================================राष्ट्रकुल स्पर्धा, CWG============================================

Go to Hell..met..!

Look at this Helmet. This Helmet has been broken! Obviously we can say..Hey..Hel..l..met..! Go to Hell to met..

दसर्‍यापूर्वीच सुवर्ण प्राप्ती

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत खरोखर लक्षणीय कामगिरी करून..हम भी किसीसे कम नही...हे जगाला दाखवून दिले आहे. खेळाडूंच्या मनोकामनेप्रमाणे शेवटपर्यंत द्वितीय स्थानावर भारत राहो, हीच सदीच्छा..

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...