चिलीच्या उत्तरेस असलेल्या ऍटाकामा प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात नौदलास यश आले. यासाठी एक विशिष्ट आकाराची कॅप्सुल (५४ सेंटीमीटर रुंद) तयार करून ती कॅप्सुल खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आली होती. या कॅप्सुलमध्ये एकावेळी एक व्यक्तीच समाविष्ट केली जात होती. यामुळे खाणीतल्या अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात जास्त वेळ लागला. परंतु कोणाचीही अखेर न होता..अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. प्राप्त सूत्रांनुसार नासा या संस्थेच्या मदतीने ही मोहिम राबविण्यात आली. या यशात खरंतर या तंत्रज्ञानाचे देखील यश महत्वाचे आहे. लाख मोलाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रुपये किंमतीची यंत्रणाच अखेर उपयोगी पडली...।
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.