मुख्य सामग्रीवर वगळा

जादू चालणार..फक्त मतदारांची!

बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच..परिणामी, राहुल गांधी यांना अजून भरपूर काही शिकण्याची गरज आहे, त्यांनी शायनिंग बंद करावे असे मत आता ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी मंडळी व्यक्त करीत आहेत...! काहीही असले तरीही खरा जादूगार "मतदार"च आहेत यात शंका नाही. यावर कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी यादवांवर टीका केली. बिहारमध्ये राहुल यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून झालेल्या निराशेतूनच त्यांचे राजकीय संतुलन बिघडले आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012