"बर्ड्स अँड बिग कॅट्स" प्रदर्शन उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, किरण शांताराम, अॅड. अधिक शिरोडकर आदी |
अॅड. शिरोडकर यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांमध्ये रमले आहेत. त्यांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या प्रदर्शनात आहेत. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शिरोडकर यांनी पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले असून, हे प्रदर्शन मनाला आनंद आणि निसर्गाच्या वैविध्याचा परिचय करून देणारे आहे. डिजिटल युगात छायाचित्रणाची कला बरीच सुलभ झाली आहे. परंतु जुन्या कॅमेर्यांनी छायाचित्रण करताना खूप कसरत आणि मेहनत करावी लागते. मनासारख्या छायाचित्रासाठी विशिष्ट क्षणाची वाट पहावी लागत असून, संयमाच्या या परीक्षेत शिरोडकर यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यास विचारात घेऊन त्यांना पर्यावरण विषयक विविध समित्यांवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
वन्यजीवनाविषयी असलेली ओढ आपल्याला शांत बसू देत नाही. दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत आहे, जंगल कमी होत असून ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. याविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केल्याचे श्री. शिरोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमास किरण शांताराम, विठ्ठल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.