मुख्य सामग्रीवर वगळा

झाले इंदूरकर रसिक मंत्रमुग्ध: गीतरामायण

येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले.
श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्यापर्यंत पाहोचू शकले व शब्दातील अभिप्रेत भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकला.
श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या "राम जन्मला, कुश-लव रामायण गाती, पराधीन आहे जगती, माता न तू वैरिणी, जय गंगे जय भागीरथी, जेथे राघव.." इ. अनेक गीतांनी रसिक मने न्हाऊन निघाली.
आपण आपले वडिल म्हणजेच स्व. बाबूजी यांना घाबरत होतो, गीतरामायणातील पद सर्वप्रथम आपण आपल्या आईला सर्वप्रथम ऐकवले, हे पद ऐकवताना मला अचानक बाबूजी तिथे आल्याचे जाणवले आणि साक्षात बाबूजी तिथे उभे असल्याचे पाहून पार घाबरगुंडी उडाली, मात्र त्यांनी कौतुकाने पाठीवर हात फिरवून गाणे सुरू ठेवण्याची सुचना केल्याने खूप आनंद झाला, असे सांगितले. गीतरामायणाची रचना १९५५ मध्ये करण्यात आली, गीतरामायणातील विविध शब्दांवर बाबूजींनी दिलेला जोर त्याचे महत्व आदी गोष्टी विशद केल्या. गीतरामायण कितीही कथन केले तरीही वेळ अपूर्णच वाटतो, सर्वकाही आपल्या समोरच सुरू असल्याची हे गाताना आपल्याला अनुभूती येते या शब्दात मनोगत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी श्रीधर फडके यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ‘संगीत मनमोही रे’ ही नुकतीच प्रकाशित झालेली त्यांची सीडी यावेळी श्रीधर फडके यांच्या स्वाक्षरीसह वितरीत करण्यात आली.
श्रीधर फडके यांनी इंदूरकर अजूनही मराठी टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करून मराठी बोलणारा आजकाल मुंबईत दुर्मिळ होत चाललाय असे मत व्यक्त केले. पार्षद विनिता धर्म यांनी सूत्रसंचालन केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012