मुख्य सामग्रीवर वगळा

इंडो-चायना फटाके: यंदाचा आनंद ठरणार उद्याची डोकेदुखी...!

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा बहुसंख्य ठिकाणी 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके बाजारपेठेत उपलब्ध करण्यावर निर्मात्यांचा भर आणि विक्रेत्यांचा कल आहे. फटाक्यांच्या उत्पादनासाठी फटाके उत्पादकांनी चिनी फटाके उत्पादकांच्या सहकार्याने यंदा इंडो-चायना फटाके दिसतील. कमी आवाजाचे आणि या फटाक्यांमधून विविध रंग ओसंडून असल्यामुळे ग्राहकांना आणि शासनाला दोघांनाही आनंद होईलच. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे लवकरच हा आनंद मावळून ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताचा किती मोठा भूभाग बळकावला आहे याची कल्पना देखील न करता येईल असे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेख, बातम्यांवरून वाटते. सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने अक्षरशः कॅप्चर केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चायना मार्केट च्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय.
इंडो-चायना फटाके तयार करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली, कुणास ठाऊक! परंतु याची फलप्राप्ती चांगली होणार नाही. ग्राहक एकदा हॅबिच्युअल झाल्यानंतर त्याला अपेक्षित ब्रँड मिळाल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. या फटाक्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाल्यास चीन लवकरच त्यांचे स्वतःचे फटाके देखील भारतीय बाजारपेठेत विक्रीस आणू शकते अशी भीती तज्ज्ञ जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही भीती खरी ठरल्यास देशातील फटाके निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाकाशीसारख्या अनेक ठिकाणच्या फटाके तयार करण्याच्या कारखान्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागेल आणि शासन नेहमीप्रमाणे कोणतीही कृती करणार नाही असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012