दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मल्लांनी कुस्तीमध्ये सलग दहा (10) सुवर्ण पदके प्राप्त करून देशाच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाच्या नावलौकिकात उज्जवल यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. देश सर्वच बाबतीत पुढे आहे. खेळाडूंना अनेक दिवसांपासून दिलेले प्रशिक्षण आणि मिळालेल्या सुविधा, मार्गदर्शन आणि त्यांचा हुरुप..यामुळेच हे शक्य झाले आहे. पुरुष खेळाडूंची बरोबरी महिला खेळाडूंनी सुध्दा केली आहेच. नेमबाजीद्वारे आपले लक्ष्य सहज टिपुन सुवर्ण पदकांचे मानकरी देखील आपण ठरलो आहोत.
देशाने आपल्या पिलांना मोठे करण्यासाठी जगात कुठेही स्वच्छंदपणे उडून यश मिळवण्यासाठी त्यांच्या पंखांना असेच बळ कायम देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सुद्धा व्यसनापासून दूर रहावे, देशाने सुद्धा भ्रष्टाचारापासून दूर व्हावे..। असे झाल्यास भारत खरंच महाशक्ती होऊन बलशाली होईल, यात शंकाच नाही.
===========================================राष्ट्रकुल स्पर्धा, CWG============================================