दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समिती मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या कार्यालयात कॉम्प्यूटरची रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) चोरल्यामुळे एका संशयित सफाई कर्मचार्याला ताब्यात घेण्यात आले. बिच्चारा! @ हा सफाई कर्मचारी देखील ई-एज्युकेटेड किंवा माहिती तंत्रज्ञान विषयात प्रवीण असावा, किंवा बेरोजगारीची कुर्हाड याच्यावरही कोसळली असावी. अनेकांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, आपण हजारांचा भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले? असे याला वाटले असावे आणि कार्यभाग साधला असावा. परंतु मांजर डोळे मिटुन दूध पिताना कोणी ना कोणी त्याला पाहतेच नां...। अगदी तेच केलंय क्लोज-सर्किट कॅमेर्यांच्या डोळ्यांनी...।
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.