मुख्य सामग्रीवर वगळा

सोने झाले सोन्यासारखे..

अशी खचितच एखादी व्यक्ती असेल, की जिला सोनं आवडत नाही, आकर्षण नाही...। अगदी श्रीमंतांपासून गरीबापर्यंत समाजातील सगळ्याच घटकांना सोन्याची क्रेझ असते. त्यातल्या त्यात महिलांचं तर विचारुच नका। सोनं न आवडणारी महिला शोधूनही सापडणार नाही.
सोन्याचा उपयोग विशेषतः मध्यमवर्गीयांना व्यवहार करण्यासाठी चांगलाच होतो. कोणत्याही अडचणीत पैसा जवळ नसला, कमी पडत असला, ऐनवेळी इमर्जन्सी उद्भवल्यास सोनंच शेवटी पैसा मिळवून देणं हा एकमेव पर्याय असतो. इतकं अमूल्य महत्व सोन्याचं आहे. परंतु दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत असून मध्यमवर्गीयांसाठी तरी ते सोन्यासारखेच जणू झाले आहेत. परिणामी आगामी लगीन सराईमध्ये आपल्या मुलीच्या अंगावर सोनं घालण्याबाबत पालक चिंतेत आहेत. सध्या (ही बातमी टाइप होईपर्यंत) सोन्याने वीस हजाराचा टप्पा ओलांडला आहे. थेंबे थेंबे तळे साचे..या उक्तीप्रमाणे एक-एक ग्रॅम सोनं जमवायचा विचार केला तरीही तो सहजासहजी शक्य नाही. कारण सतत वाढणार्‍या महागाईमुळेच उद्याची चिंता असलेली सामान्य व्यक्ती एकदम दोन हजार रुपये देऊ शकत नाही. आज अनेक देणी द्यायची असल्यामुळे पैशाला जणू पाय फुटले असल्याचे चित्र आहे. दिवाळी देखील तोंडावर येऊन ठेपली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012