मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डेक्कन ओडिसी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महाराष्ट्र दर्शन

मुंबई, ता. २४ - महाराष्ट्राची लक्झरी ट्रेन 'डेक्कन-ओडिसी' ने बर्‍याच कालावधीनंतर नियमित सहलमार्गावर धाव घेतली. दिनांक १६ ते २३ फेब्रुवारी २०११ या कालावधीत या गाडीतून सुमारे ७५ परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची सफर घडविली असल्याची माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) देण्यात आली. 'डेक्कन-ओडिसी' मुंबई, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, गोवा येथील प्रसिद्ध गिरजाघरे, समुद्रकिनारे, कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, ताडोबा अभयारण्य, नाशिक येथील गोदावरी घाट आणि प्रसिद्ध मंदिरे इ. ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली. सहलीदरम्यान पर्यटकांचे ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचे दर्शन घेडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या हंगामात डेक्कन ओडिसीच्या ८ सहली करण्याचा प्रयत्न होता, तथापि पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नोव्हेंबर व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेची अवास्तव हॉलेजची मागणी, सहलीच्या महसूलातील वा...

'डेक्कन ओडिसी' चे लवकरच पुनरुज्जीवन: एमटीडीसी बैठकीत निर्णय

मुंबई, ता. २२ - महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचे वैभव असलेल्या 'डेक्कन ओडिसी' या लक्झरी ट्रेनचे उत्तम पद्धतीने लवकरच पुनरुज्जीवन करून राज्यांतर्गत तिच्या अधिकाधीक सहली आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) बैठकीत घेण्यात आला. हॉलेज आकारात कपात करण्यासाठी केंद्र शासनाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा ठरावही करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. बैठकीस पर्यटन राज्यमंत्री व महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत कांबळे, पर्यटन विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर तसेच महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात इको-टुरिझमचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्र वनविकास महामंडळासमवेत सामंजस्य करार केला आहेय यानुसार संरक्षित वनहद्दीच्या बाहेर एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटक निवासासह अन्य आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. सं...