मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Nagpur India लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी

नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे. नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील य...