मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

छपन्न खेडी प्रादेशिक योजना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नांदगाव व छपन्नखेडी प्रादेशिक योजनेतून नांदगाव पालिकेने स्वतंत्र होण्याची गरज - भुजबळ

 मुंबई, ता. १८ - नांदगाव शहर व छपन्नखेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नांदगाव नगरपरिषदेने स्वतंत्र व्हावे आणि शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन व वितरण यंत्रणा ताब्यात घेऊन सुनियोजित पद्धतीने चालवावी. अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली. श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज या योजनेच्या समस्यांसंदर्भात सर्व संबंधितांची बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार पंकज भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सचिव मालिनी शंकर, स्थानिक अभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले की, नांदगाव व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती लक्षात घेता ही योजना सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने तिचे विभाजन करण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणीपट्टीची मोठी थकबाकी आणि वाढीव पाणीपट्टीचा भार पेलण्याबाबत नांदगाव नगरपरिषदेने व्यक्त केलेली असमर्थता इ. लक्षात घेता नांदगाव परिषदेने शहराची पाणीपुरवठा योजना ताब्यात घ्यावी. चांगल्या कंत्राटदारास देखभाल-दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची ...