मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मनोविकास प्रकाशन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले

आजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते ‘ महानामा ’ चं प्रकाशन चिपळूण- महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. ' महानामा ' या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल , असा विश्वास चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केला. संत नामदेवांच्या कामाची सामाजिक सांस्कृतिक अंगाने मांडणी करणा-या पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित ' महानामा ' या पुस्तकाचं कोत्तापल्ले आणि मागील संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक आमदार उल्हास पवार , कवयित्री प्रभा गणोरकर उपस्थित होते. ‘ मनोविकास प्रकाशना ’ ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाविषयी कोत्तापल्ले पुढं म्हणाले ,   संत नामदेव हे मराठीतील आद्य आत्मचरित्रकार , आद्य प्रवासवर्णनकार. पण त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष झालं. या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नामदेवरायांच्या कार्याल