मुंबई, दि. 2 मे : अंधेरी (पश्चिम) येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कामकाज नूतन इमारतीतून सुरू व्हावे, या दृष्टीने या इमारतीच्या किमान पहिल्या मजल्याचे संपूर्ण काम येत्या 15 दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंधेरी (पश्चिम) येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंडाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाचा श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत स्टील्ट अधिक दुमजली असणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम बाकी असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे, जेणे करून प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतरित करता येऊ शकेल. त्याचबरोबर पाणी व विजेच्या जुन्या जोडण्याही...