मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

internet लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इंटरनेटवर मैत्री करताय...जरा जपून!

दशकापासून इंटरनेटच्या नेटमध्ये फक्त तरुणाईच गुंतली होती... !   आजकाल कुतूहलाने का होईनां वडिलधारी मंडळी सुद्धा इंटरनेटवर सर्फ करू लागली आहे. सोशल नेटवर्क, सामाजिक वेबसाइट्सच्या माध्यमातून मित्र-मंडळी जमवू लागली आहे. यानिमित्ताने , इंटरनेटवर मैत्री करताना जपून, विचारपूर्वक करावी, हेच इथे नमूद करावसं वाटतंय... ! “ Share life’s important moments with just right people! ” रोजचं काम सुरू असताना एका ठिकाणी ही ओळ दिसली आणि बस्स …! विचारचक्र सुरू झालं, हे वाक्य सर्वसामान्यांच्या जीवनात बरंच काही सांगून जातं, केवळ हृदयात नाही तर मनात सुद्धा घर करून जाणारी ही ओळ वाटली. लहानपणी आई-वडील बाहेर जाताना, “ अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, त्यांना घरात घेऊ नका, आतूनच त्यांच्याशी बोला, खूपच भीती वाटली, काही काळंबेरं वाटलं तर अगदी आरडाओरड करा. प्रवासात जाताना कोणाला आपलं खरं नाव तर अजिबात सांगू नका... ” जवळपास असाच डोस प्रत्येकालाच देतात, आईवडीलच नाही, तर सा ss री वडील मंडळी हाच डोस देतात, हा डोस आपल्याला का देतात? असं लहानपणी त्या वयामुळे वाटतं. मात्र सध्याचा काळ, वेळ, घटना पाहता हे खूपच ...

इंटरनेट गावोगावी पोहोचणार, पण..

अजूनही घराघरात कॉम्प्यूटर नाही.... अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही.... अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे.... अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत.... अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो.... अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात.... अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत.... अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही.... अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!