मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

केंद्रीय अर्थसंकल्प-२०११ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प: अजित पवार

मुंबई, ता. २८ - केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वंकष विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली. श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीच्या भरीव तरतुदीबरोबरच डाळी, भाजीपाला, बाजरी, ज्वारीच्या उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न म्हणजे खर्‍या अर्थाने दुसर्‍या हरितक्रांतीच्या दिशेने टाकलेली दमदार पावले आहेत. कृषी पतपुरवठ्यातील एक लाख कोटी रुपयांची भरीव वाढ तसेच मांस, मासे, दूध आदींच्या उत्पादन आणि वितरणात सुलभतेसाठी आखलेल्या योजना शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार्‍या आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी केलेल्या तरतुदीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वंकष उन्नतीस हातभार लागेल . अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की सध्या अस्तित्वात असलेल्या विशाल किंवा अतिविशाल ऊर्जा प्रकल्पांना भांडवली वस्तूचा पुरवठा करणार्‍या डोमेस्टिक सप्लायर्सनां पॅरलल एक्साईज ड्यूटीतून सवलत मिळणार आहे. तसेच पीपीपी अंत...