मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रमेश वांजळे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रमेश वांजळे यांच्या निधनामुळे धडाडीचा लोकप्रतिनिधी हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला येथील आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनामुळे एक धडाडीचा आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 'गोल्ड मॅन' म्हणून राज्यभरात प्रसिध्द झालेल्या आमदार रमेश वांजळे यांनी आपल्या धडाडीच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील जनतेची मनेही जिंकली होती. महाराष्ट्र विधीमंडळातही त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काम करत चमक दाखविण्यास सुरवात केली होती. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मतदारसंघातील जनतेवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. रमेश वांजळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही श्री. भुजबळ यांनी केली आहे.