मुख्य सामग्रीवर वगळा

रमेश वांजळे यांच्या निधनामुळे धडाडीचा लोकप्रतिनिधी हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला येथील आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनामुळे एक धडाडीचा आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 'गोल्ड मॅन' म्हणून राज्यभरात प्रसिध्द झालेल्या आमदार रमेश वांजळे यांनी आपल्या धडाडीच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील जनतेची मनेही जिंकली होती. महाराष्ट्र विधीमंडळातही त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काम करत चमक दाखविण्यास सुरवात केली होती. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मतदारसंघातील जनतेवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. रमेश वांजळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही श्री. भुजबळ यांनी केली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.