मुंबई, दि. 9 जून : जमिनीवरुन पाण्यावर किंवा पाण्यावरुन नोकेवर अशा प्रकारे सर्व सहज संचार करण्यास सक्षम असणाऱ्या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणाऱ्या विमानसेवेचे (अँफिबियन विमान) सादरीकरण पाहून राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आज अत्यंत प्रभावित झाले. ही सेवा पुरविणाऱ्या `मेहेर` या कंपनीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली.
मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (MAHAIR) ही अशा प्रकारची सेवा पुरविणारी भारतातली पहिली विमानसेवा कंपनी आहे. अंदमान व निकोबार बेटांवर त्यांनी ही अँफिबियन विमानसेवा पुरविण्यास सुरवात केली आहे. या कंपनीच्या वतीने आज श्री. भुजबळ यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर आदी यावेळी उपस्थित होते.
सादरीकरणानंतर श्री. भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची 720 किलोमीटर लांबीची कोकण किनारपट्टी तसेच राज्याच्या अन्य दुर्गम भागामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही विमानसेवा कमालीची उपयुक्त ठरू शकते. ज्याठिकाणी विमाने उतरण्यासाठी धावपट्ट्या नाहीत अथवा हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड्स नाहीत, अशा ठिकाणी कोणत्याही जलपृष्ठावर उतरण्यास ही विमाने सक्षम आहेत. महत्त्वाचे म्हणजे इतर विमानसेवांच्या तुलनेत ही सेवा स्वस्तही आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही सेवा सकृतदर्शनी उपयुक्त दिसते. यामुळे पर्यटकांची सोय तर होईलच, पण त्याचबरोबर काही तातडीच्या प्रसंगी पाण्यातून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी सुद्धा या सेवेचा उपयोग करून घेता येऊ शकेल. त्यामुळे येत्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात कंपनीने शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, जेणे करून ऑक्टोबर 2011पासूनच ही सेवा राज्यात कार्यान्वित करण्याबाबत विचार करता येऊ शकेल.