मुंबई, दि. 12 जून : राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास जे. डे यांचा पार्थिव देह जे.जे. रुग्णालयातून त्यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी आणण्यात आला आणि तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. श्री. भुजबळ यांनी जे. डे यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून त्यांना अखेरचे अभिवादन केले.
'एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला तरी, त्याची गांभिर्याने दखल घेण्यात येते. इथे तर डे यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे राज्य शासन आणि पोलीस प्रशासन संबंधित माफियांविरोधात कठोर पावले उचलल्याखेरीज राहणार नाही,' असे भुजबळ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.