महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.