मुंबई, दि. 11 जून : 'दैनिक मिड-डे'चे ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर जे. डे यांच्या हत्येचे वृत्त समजून आपल्याला अत्यंत धक्का बसला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व शोक व्यक्त केला आहे.
श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्राइम रिपोर्टिंग आणि शोध पत्रकारितेच्या क्षेत्रात जे. डे यांनी गेली कित्येक वर्षे आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. पोलीस, खबरे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. डे हे अत्यंत उमद्या व उत्साही स्वभावाचे पत्रकार होते. माझेही त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांची अशा प्रकारे हत्या व्हावी, ही घटनाच क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
जे. डे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि खबऱ्यांचे जाळे या विषयावर झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या 'खल्लास' आणि 'झिरो डायल' या आपल्या पत्रकारितेतील अनुभवावर अत्यंत रोमहर्षक आणि थरारक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या. गेल्या दोन दशकांत महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगताची अंडरवर्ल्डकडून दहशतवादाकडे झालेली वाटचाल रेखाटलेल्या 'झिरो डायल' या कादंबरीचे गेल्या ऑगस्ट 2010मध्ये माझ्या हस्ते 'क्रॉसवर्ड'मध्ये प्रकाशन झाले होते, अशी आठवणही भुजबळ यांनी करून दिली.