मुख्य सामग्रीवर वगळा

तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधणार: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १६ - राज्यातील तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज तमाशा कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीत तमाशा जिवंत ठेवण्याचे काम करणार्‍या या कलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची आवश्यकता असते. यासाठी त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. तमाशा कलेला चालना देण्यासाठी कायमस्वरूपी निवासी प्रशिक्षण शाळा उभारण्याचा शासन विचार करीत आहे. याबरोबरच या कलावंतांसाठी निवासी संकुल उभारण्यासाठी पुण्याजवळ भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईत तमाशासाठी थिएटर उभारण्यासाठी सिडकोमार्फत लवकरच कार्यवाही केली जाईल.

ते पुढे म्हणाले की, तमाशा कलावंतांना स्वतःचा फड तसेच थिएटर उभारण्याकरिता कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच निर्णय घेतला जाईल. तमाशा कलावंतांना संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले इतर मागासवर्गीय विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर प्रतिनिधित्व दिले जाईल.

बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, शिक्षण विभागाच्या सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास, सांस्कृतिक कार्य संचालक दिलीप शिंदे, अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे, उपाध्यक्ष यशवंत गाडे, प्रदीप पवार, कांताताई काळे, मंदाबाई मुसळे, शारदा मुसळे आदी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012