
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, योग व अध्यात्मिक गुरू असलेल्या श्री श्री रवीशंकरयांचे अनुयायी जगभरात आहेत. सदैव हसतमुख असणार्या या महान गुरूच्या जीवनावर त्यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी यांच्या मानवतावादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. आचार्य रत्नानंद यांच्या निधनामुळे श्री श्री रवीशंकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शिष्यपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभावे व आचार्य रत्नानंद जी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना श्री. भुजबळ यांनी केली आहे.