मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील साहित्य-नाट्य संमेलनांना अनुदान: अजित पवार


 मुंबई, ता. २२ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलन तसेच नाट्य संमेलनांना अनुदान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गावांना विविध योजनांसाठी आर्थिक मदत देण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिले जाईल. बेळगाव येथे भरणार्‍या साहित्य संमेलनास दरवर्षी तर इतर ठिकाणी होणार्‍या संमेलनांना आलटून-पालटून अनुदान दिले जाईल. याशिवाय नाट्य संमेलन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर या भागातील मराठी ग्रंथालये सुसज्ज व्हावीत यासाठी ग्रंथ-पुस्तक खरेदी, संगणकीकरण तसेच इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रंथालय संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील.

बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक विभागाच्या राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, अर्थ विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, शिक्षण विभाग सचिव व्ही. राधा, बेळगावचे माजी आमदार बी. आय. पाटील, रवी गिंडे आदी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012