मुंबई, ता. २३ - श्रीक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीनित्त आळंदी ते पंढरपुर मार्गावर पालख्यांबरोबर जाणार्या वारकरी बांधवांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे २२ जून ते ११ जुलै या कालावधीत मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी संस्थेचे पथक सज्ज झाले आहे.
यावर्षी संस्थेचे वैद्यकीय पथक शनिवारी (ता. २५) नेहरूनगर, कुर्ला, मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यास के. ई. एम. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, असे संस्थ्चे विश्वस्त डॉ. सुनिल हलुरकर यांनी कळविले आहे.
ही मोफत वैद्यकीय सेवा संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपुर या मार्गावर वारकर्यांना दिली जाईल. यासाठी संस्थेने सुमारे आठ रुग्णवाहिका, औषधांचा पुरेसा साठा आणि सेवाभावी १०० डॉक्टर व १५० स्वयंसेवकांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. या समाजसेवी उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर पंढरपुरकडे पायी जाणार्या वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक ते औषधोपचार व वैद्यकीय सेवा ट्रस्टतर्फे अगदी मोफत पुरविली जाईल. पालखीच्या मार्गावरील सुमारे २९ ठिकाणी संस्थेतर्फे मदत पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. संस्थेने दोन वर्षात अशा प्रकारचे उपक्रम आळंदी, पंढरपुर, देहू, जेजुरी, उत्तराखंड, मुंबादेवी, महालक्ष्मी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, मांढरदेवी, दादर-चैत्यभूमी इ. ठिकाणी यशस्वीरितीने राबविले आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. हलुरकर (९८६९१ ०१५८२) आणि प्रभाकर कोंबेकर ( ९९८७३ ४७६११) येथे संपर्क साधावा.