मुंबई, दि. 13 जून : भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हेनिया यांना पायाभूत सुविधा, रस्ते-विकास आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वृध्दीस मोठी संधी असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले. युरोपीय समूह देशांतील 'प्रजासत्ताक स्लोव्हेनिया' या देशाच्या वित्त मंत्री श्रीमती दार्जा रॅडिक यांनी शिष्टमंडळासह श्री. भुजबळ यांची त्यांच्या 'रामटेक' निवासस्थानी आज सकाळी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्लोव्हानियाच्या व्यापार मंत्री श्रीमती मोइका ऱ्होवॅटिक तसेच सेक्रेटरी श्रीमती मेत्का अर्बास तसेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर आणि महाव्यवस्थापक विजय चव्हाण उपस्थित होते.
यावेळी श्रीमती रॅडिक यांनी भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हानिया यांच्यामधील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने आपण मुंबई भेटीवर आल्याचे भुजबळ यांना सांगितले. त्यावर श्री. भुजबळ यांनी श्रीमती रॅडिक यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, विदेशातील पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, अशी कित्येक अद्वितीय पर्यटनस्थळे महाराष्ट्रात आहेत. सुंदर सागरी किनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, गुंफा, लेणी, राजवाडे, लोणार सरोवर याबरोबरच प्रगत महाराष्ट्रात अनेक जागतिक दर्जाचे उद्योगही आहेत. औद्योगिक क्षेत्राबरोबरच पायाभूत सुविधा व रस्ते विकासाच्या क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी झेप घेतल्याचे भुजबळ यांनी निदर्शनास आणले.
श्रीमती रॅडिक यांनीही युरोपमध्ये भारतीय पर्यटक मोठया संख्येने येत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगितले. केवळ दोन दशलक्ष लोकसंख्या असलेल्या स्लोव्हानियामध्ये अनेक उत्तम नैसर्गिक पर्यटनस्थळे असून भारतीय पर्यटकांनी स्लोव्हानियासही आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन केले. मुंबई शहराच्या दर्शनानेही आपणास अत्यंत आनंद झाला असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली.