मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Budget-2012 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

केंद्रीय अर्थसंकल्पाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दिनांक 16 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागाला दिलासा तसेच कृषि क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार असून ग्रामीण सडक योजना गतीने मार्गी लागतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील 8,800 कि.मी. लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण सडक योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मुलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पात कृषि, परिवहन तसेच ऊर्जा या क्षेत्रावर भर दिला आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची व्याप्तीदेखील वाढविली आहे. शिक्षण घेण्यासाठी झालेली समाजाची जागृती विचारात घेता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली असल्यामुळे शैक्षणिक